कोल्हापुर : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर देशातील राजकीय वातावरण गरम होऊ लागलंय. यातच महाराष्ट्रात दोन्ही आघाड्यांनी अद्याप आपले पत्ते खोलले नाहीत. मात्र काही दिवसांपासून कोल्हापुरच्या जागेची चांगलीच चर्चा सुरूय. काही दिवसांपुर्वी शरद पवार नवीन राजवाड्यावर गेले, अन् शाहू महाराज उमेदवार असतील तर आनंदच होईल असे पवारांनी जाहीर केल्यानंतर सगळेच जण शाहू महाराजांसाठी मैदानात उतरले. कोल्हापुराची जागा ठाकरे गटाची असल्याने शाहू महाराजांनी ही जागा आमच्याकडून लढवावी, असे राऊतांनी जाहीर केलं. तर दुसऱ्या बाजूला शाहू महाराजांसाठी कॉंग्रेसनेही आग्रहाची भूमिका घेतली. यातच आता संभाजी राजे यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, फॉर्म्युलाही ठरला
मी लोकसभा निवडणुक लढवणार होतो, परंतु माझं तसं ठरलं होतं. मी कोल्हापुर किंवा नाशिक मतदारसंघाचा विचार करत होतो. परंतु माझ्या वडिलांनी निवडणुक लढवायचं ठरवलं आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केल्यावर माझा निवडणुक लढवण्याचा प्रश्नच उरत नाही. माझे वडिल माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यामुळे मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना तयारी करण्यास सांगितलं आहे. मी ही निवडणुक लढवली असती तर माझं शंभर टक्के योगदान दिलं असतं. आता महाराज लढणार आहेत म्हटल्यावर महाराजांसाठी आम्ही १०० टक्के योगदान देऊ असेही राजे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…“तर अजित पवार अन् शिंदेंच्या उमेदवारांना कमळावर निवडणुक लढवावी लागेल”, महायुतीत मोठी खलबतं
दरम्यान, शाहू महाराज मशाल किंवा हाताचा पंजा यापैकी कुठल्या चिन्हावर निवडणुक लढवणार आहेत ? असा सवाल केला असता संभाजी राजे म्हणाले की, शाहू महाराजांची भूमिका मी मांडू शकत नाही. त्यांची भूमिका तेच स्पष्ट करतील. तसेच कोल्हापुरच्या जनतेलाही महाराज हवे आहेत. महाराज प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. परंतु त्यांच्या उमेदवारीबाबत मविआ नेते काय निर्णय घेणार आणि महाराजांची भूमिका काय असेल ते आपल्याला लवकरच कळेल, असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“सदनिका घोटाळ्यात मुख्यमंत्र्याचा वरदहस्त आहे का?” 10 कोटीचा घोटाळा, वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
हेही वाचा…“जितक्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला, तितक्याच राष्ट्रवादीला ,” भुजबळांनी स्पष्टच सांगितले
भामरेंचा पत्ता कट, प्रतापराव दिघावकर भाजपचे नवे उमेदवार, धुळ्यात कमळ फुलणार का ?
हेही वाचा…माढा लोकसभेतून जानकरांना उमेदवारी, शरद पवारांच्या ‘या’ शिलेदारानेही थंड थोपटले
हेही वाचा…“शरद पवारांना आता सपोर्ट करण्याची गरज”, अजित पवारांच्या पुतण्याचं वक्तव्य