मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची जागावाटपाबाबत आज बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह शिवसेना आणि अजित पवार गटातील नेते उपस्थितीत होते. मुंबईत पार पडललेल्या बैठकीत ४८ लोकसभा मतदारसंघापैकी भाजपला सार्वधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर यातच आता मंत्री छगन भुजबळल यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…२२-१८-०९ महाविकास आघाडीचा फॉर्म्युला, मुंबईत आज महत्वाची बैठक
मुंबईत झालेल्या बैठकीवर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. जेवढ्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला असणार तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात अशी भूमिका भुजबळांनी मांडलीय. काल आणि आज या दोन दिवसांता १५ ते १६ लोकसभा मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्ते यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी कालपासून आमच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित होते. कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिका समजून घेतल्या आहेत. असेही भुजबळ म्हणाले.
हेही वाचा…“ठाकरेंना मोदींसोबत यावचं लागणार, अंदाज चुकणार नाय”, शिंदें गटातल्या आमदाराचा मोठा दावा
दरम्यान, महायुतीकडून अजित पवार गटाला २०१९ च्या लोकसभेत जिंकलेल्या जागा देण्यात येणार आहेत. यामध्ये बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या मतदारसंघाचा समावेश आहे. तर परभणी, गडचिरोली, धाराशिव, दिंडोरी, बुलढाणा या जागांवरही अजित पवार गट आग्रही आहे. त्यामुळे अंतिम बैठकीत महायुती काय निर्णय घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
भामरेंचा पत्ता कट, प्रतापराव दिघावकर भाजपचे नवे उमेदवार, धुळ्यात कमळ फुलणार का ?
हेही वाचा…माढा लोकसभेतून जानकरांना उमेदवारी, शरद पवारांच्या ‘या’ शिलेदारानेही थंड थोपटले
हेही वाचा…“शरद पवारांना आता सपोर्ट करण्याची गरज”, अजित पवारांच्या पुतण्याचं वक्तव्य
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, फॉर्म्युलाही ठरला
हेही वाचा…“तर अजित पवार अन् शिंदेंच्या उमेदवारांना कमळावर निवडणुक लढवावी लागेल”, महायुतीत मोठी खलबतं