मुंबई : गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेवर आज शिक्कामोर्तेब होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची मुंबईत लोकसभा निवडणुक जागावाटपाबाबत बैठक होत आहे. याबैठकीला महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसह वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर देखील उपस्थितीत राहणार आहेत. राज्यातील काही जागांवरून वाद होता. परंतु या बैठकीत तो वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्याआधी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेही वाचा…“महाराष्ट्र ५० वर्षांपासून तुमचा भार सोसतोय,”पहिल्याच सभेत अमित शाहांकडून शरद पवारांचा समाचार
मला मिळालेल्या माहितीनुसार २२-१८-०९ असा फॉर्म्युला महाविकास आघाडीमध्ये ठरलेला आहे. परंतु त्यातून १५ जागांवरून भांडणं सुरू आहेत. त्यामुळे या जागांवरून तिढा सुटत नाही. तोपर्यंत हा फॉर्म्युला खरा असं मी मानत नाही. यातच त्यांची भांडण मिटत नाही तोपर्यंत आम्ही यावर काहीही बोलू शकत नाही. असं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. ज्या जागांसाठी भांडण सुरू आहेत. त्यात मी काही पुढाकार घेणार नाही. जर त्यांनी सांगितले तर मी पुढाकार घेऊन नाही तर मी गप्प बसणार. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत मराठा समाज देणार ५०० उमेदवार, मराठा समाज देणार मोठा दणका
काल उद्धव ठाकरे यांनी २२ जागांचा प्रस्ताव घेऊन शरद पवारांची भेट घेतली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागा लढवल्या होत्या. त्या सर्व जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस देखील पंधरा ते अठरा जागांसाठी इच्छूक आहेत. यातच वंचितने महाविकास आघाडीकडे २७ जागांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यातील पाच ते सहा जागा वंचितला देण्यात येतील, असे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
तर शरद पवार गट आठ ते दहा जागांवर आग्रही असून त्या सर्व जागांची तयारी सुरू केली आहे. यातच वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याने महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून जागावाटपाच्या संदर्भातही महायुतीत चर्चा झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लोकसभेच्या उमेदवारांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाकरेंना मोदींसोबत यावचं लागणार, अंदाज चुकणार नाय”, शिंदें गटातल्या आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“आता संसदेतूनच आवाज उठवणार!” वडेट्टीवारांची कन्या लोकसभेसाठी इच्छूक
हेही वाचा…महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर होणार शिक्कामोर्तब, आंबेडकरही बैठकीला उपस्थित राहणार
हेही वाचा…“हा कावा महाराष्ट्रात चालणार नाही, वाऱ्या तुमच्या, पण वारे आमचेच”, ठाकरेंच्या शिलेदारांने थेट शाहांनाच दिले चॅलेंज
“राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करा”, अमित शाह यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश