नागपुर : मला तर खरं जिल्हा परिषदेतूनच राजकीय कारकिर्दीची सुरूवात करायची होती, पण या सरकारने निवडणुका टाळल्याने ती सधी हिरावली गेली. हा लोकशाही संपविण्याचा प्रयत्न असल्याचे मी आता भर संसदेतून संपुर्ण देशाला सांगेन. मी सक्षम नसेल तर मला मतदार नाकारतील. केवळ वडिलांच्या नावावर नव्हे तर स्वत: च्या कामाच्या बळावर मी तिकीट मागितले आहे. असे रोखठोक वक्तव्य करीत प्रदेश कॉंग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातील आपला दावा प्रथमच जाहीर केला आहे. शिवानी वडेट्टीवार या राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या असून त्या लोकसभा निवडणुक लढण्यासाठी इच्छूक आहेत.
हेही वाचा…२३ जागांचा प्रस्ताव घेऊन ठाकरे पवारांच्या भेटीला, मुंबईत जागावाटपांबाबत खलबत्तं
चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांचे नाव समोर आल्यानंतर कॉंग्रेसमधून कोण ? हा प्रश्न आल्यानंतर कॉंग्रेसमधून शिवाजनी यांनी उमेदवारीसाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट केले आहे. मंगळवारी त्यांनी यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. चंद्रपुर हा औद्योकिदृष्ट्या महत्वपुर्ण भाग आहे. सीटीपीएस, सिमेंट आणि इतर अनेक बडे उद्योग या भागात उभे राहिले आहे. कंत्राटी कामगारांचे प्रश्नही ओघाने वाढले आहे. या कामगारांसाठी मागील चार वर्षांपासून सातत्याने मी लढा दिला.
हेही वाचा….नवनीत राणांची महायुतीकडून उमेदवारी निश्चित, आनंद अडसुळांना राणांचा प्रचार करावा लागणार
अंबुजा सिमेंट कंपनीतील कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळवून देण्यासाठी तीन दिवस अथक आंदोलन केले. त्यांना यश मिळवून दिले. चंद्रपुर जिल्हा युवक कॉंग्रेस कमिटीत महासचिव म्हणून काम केले. नंतर सार्वधिक मतांनी निवडून येत प्रदेश युवक कॉंग्रेस कमिटीची महासचिव झाली. २०१९ च्या निवडणुकीत ब्रह्यपुरी विधानसभा तमदारसंघात काम केले. सध्या कॉंग्रेसकडून तिकीट मागण्यांपेक्षा पक्षात नक्कीच अधिक काळापासून काम करतीत आहे. त्यामुळे माझा दावा अधिक प्रबळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर आमदार प्रतीभा धानोरकर यांनी चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून दावा सादर केला आहे. तिकीट मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. ते कुणाला द्यायचे ते अधिकार सर्वस्वी पक्षाचा आहे. लोकसभा जिंकणे हे पक्षाचे ध्येय असल्याने सक्षम उमेदवारालाच तिकीट दिले जाईल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर होणार शिक्कामोर्तब, आंबेडकरही बैठकीला उपस्थित राहणार
हेही वाचा…“हा कावा महाराष्ट्रात चालणार नाही, वाऱ्या तुमच्या, पण वारे आमचेच”, ठाकरेंच्या शिलेदारांने थेट शाहांनाच दिले चॅलेंज
“राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करा”, अमित शाह यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश
हेही वाचा…“महाराष्ट्र ५० वर्षांपासून तुमचा भार सोसतोय,”पहिल्याच सभेत अमित शाहांकडून शरद पवारांचा समाचार
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत मराठा समाज देणार ५०० उमेदवार, मराठा समाज देणार मोठा दणका