अमरावती : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात भाजप किती जागेवर लढणार आणि मित्र पक्षांना किती जागा देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यातच शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि इतरांना किती जागा मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्षा लागले आहे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप २२ किंवा २३ जागेवर आपले उमेदवार उभे करणार असून इतर २५ ते २६ जागा मित्र पक्षांना देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच अमरावतीचा जागा ही युवा स्वाभिमान पार्टीला देण्यात येणार असून याठिकाणी पुन्हा नवनीत राणा यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…नितीन गडकरींच्या पाठीत वार करण्याचे भाजपचे षडयंत्र , गडकरींना भाजपच्या पहिल्या यादीतून वगळले
सुरूवातीला नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात येणार होतं. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप अमरावतीची जागा नवनीत राणा यांना सोडण्यात तयार आहे. त्यामुळे नवनीत राणा यांचे विरोधक आणि महायुतीत असलेले आनंद अडसुळ यांना आता नवनीत राणा यांचा प्रचार करावा लागणार आहे.
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक झाली की अनेक आमदार शरद पवारांकडे येतील”, रोहित पवारांचा मोठा दावा
दरम्यान, आनंद अडसुळ हे सध्या शिवसेना शिंदे गटात असून त्यांनी २०१९ ची लोकसभा नवनीत राणा यांच्या विरोधात लढवली होती. त्यानंतर आनंद अडसुळ यांनाच लोकसभेची उमेदवारी देण्यात येईल. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावरून आनंद अडसुळ आणि राणा यांच्यात शाब्दिक वादही झाल्याचे समोर आले. मात्र महायुतीकडून नवनीत राणा यांची उमेदवारी निश्चित मानल्याने आता अडसुळांना राणांचा प्रचार करावा लागणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नांदेडचं राजकीय वारं फिरलं, चिखलीकरांचा पत्ता कट होणार, अशोक चव्हाण नवा उमेदवार मैदानात उतरवणार
हेही वाचा…महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, भाजप २३ तर शिंदेंच्या शिवसेनेला २२ जागा ?
हेही वाचा…येत्या १४ मार्च रोजी लोकसभा निवडणुकांची होणार घोषणा, एकूण सात टप्प्यात होणार मतदान
हेही वाचा…महाविकास आघाडीकडून वंचितला ४ ते ५ जागा, उद्या महत्वाची बैठक
हेही वाचा“शिंदे गटाच्याच खासदार अन् मंत्र्यांत मोठा वाद,” भावना गवळीच्या समर्थकांची राठोड विरोधात पोस्टरबाजी