नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची नांदेडमध्ये चांगलीच ताकद वाढली आहे. अशोक चव्हाण यांचा नांदेड जिल्ह्यात चांगला प्रभाव असून आगामी काळात अशोक चव्हाण यांच्या समर्थकांपैकी नांदेड लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले जाईल याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांची डॉ. मीनल खतगावकर यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर याठिकाणी विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पत्ता कट होणार ? अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे.
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक झाली की अनेक आमदार शरद पवारांकडे येतील”, रोहित पवारांचा मोठा दावा
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी प्रतापराव चिखलीकर यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं होतं. मात्र मोदी लाटेत प्रतापराव चिखलीकर विजयी झाले. यातच आता अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांची जिल्ह्यात चांगलीच पकड आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांची समर्थक असलेल्या आणि माजी खासदार भाजपचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल खतगावकर यांना अलर्ट मोडवर आल्या आहेत. मीनल खतगावकर यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने जिल्ह्यात आता राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
हेही वाचा…लोकसभेच्या ‘या’ १७ जागांवर अजित पवार आग्रही, महायुतीत किती अन् कोणत्या जागा मिळणार ?
याआधीही मीनल खतगावकर यांनी तालुका निहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मेळावे, निवडणुकीतील चुका सुधारून संघटनात्मक पातळीवर काम वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मतदान केंद्रनिहाय सुक्ष्म नियोजन करतांना स्वत : अशोक चव्हाण यांनी यामध्ये लक्ष घातले आहे. त्यामुळे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पत्ता कट करून मीनल खतगावकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. खासदार, आमदार, मंत्री राहिलेले भास्कर पाटील खतगावकर हे अनुभवी आणि जिल्ह्यात पकड असलेले नेते आहेत. सध्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आहे. त्यांचा जनसंपर्क व राजकीय अनुभव लक्षात घेता मीनल पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. अशी जिल्ह्यात चर्चाही सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, भाजप २३ तर शिंदेंच्या शिवसेनेला २२ जागा ?
हेही वाचा…येत्या १४ मार्च रोजी लोकसभा निवडणुकांची होणार घोषणा, एकूण सात टप्प्यात होणार मतदान
हेही वाचा…महाविकास आघाडीकडून वंचितला ४ ते ५ जागा, उद्या महत्वाची बैठक
हेही वाचा“शिंदे गटाच्याच खासदार अन् मंत्र्यांत मोठा वाद,” भावना गवळीच्या समर्थकांची राठोड विरोधात पोस्टरबाजी
हेही वाचा…नितीन गडकरींच्या पाठीत वार करण्याचे भाजपचे षडयंत्र , गडकरींना भाजपच्या पहिल्या यादीतून वगळले