मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने पहिल्या यादीत १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नावाचाही समावेश आहे. महाराष्ट्रात अद्यापही कोणत्याही भाजपच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. यावरून सामानातून भाजपवर जोरदार टिका करण्यात आली आहे. भाजपच्या लोकासभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादित भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुंबईतील कृपाशंकर सिंहांचे नाव आहे. अनेक ऐरेगैरे यांची नावे भाजपच्या पहिल्या यादित आहेत. पण नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत डावलण्यात आल्याची टिका सामानातून करण्यात आली आहे.
हेही वाचा…अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, भाजपच्या खासदाराने लोकसभेचे तिकीट केले परत
नितीन गडकरी, वसुंधराराजे शिंदे, शिवराजसिंह चौहान हे भाजपचे मुळ नेते आहेत. वाजपेयी-आडवाणींच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रदीर्घ कार्य केले आहे. देशभक्तीचा व्यापार त्यांनी होऊ दिला नाही व भाजपचे वैचारिक अध:पतन रोखण्यात या नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. या सगळ्यांचेच पंख कातरले आहे. गडकरी तर छत्रपती शिवरायांचे निस्सिम भक्त. गडकरींच्या पाठीत वार करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे काय ? असा सवाल देखील भाजपला करण्यात आला आहे.
हेही वाचा…“इथल्या गद्दाराला आता आडवं करायचंच,” ठाकरेंनी मावळचा उमेदवार घोषित केला, बारणेंचं टेन्शन वाढलं
यातच ज्या विनोद तावडे यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्याच तावडे यांनी गडकरी वजा १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. २०२४ साली पक्षात कोणाचेही आव्हान असू नये व गडकरी हे आव्हान ठरू शकतात. मोदी यांनी अब की बार चारसौ पार चा नारा दिला आहे. हे खरे नाही, ही सर्व हवाबाजी आहे. भाजपचा खेल २३० -२३५ वर आटोपला तर भाजपमध्येच बंड होईल आणि मोदी शहांना वगळता भाजपचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला तर नितीन गडकरी यांच्या नावास सर्वमान्यता मिळेल, या एकाच भीतीने गडकरी यांचा पत्ता आताच कट करण्याचा डाव दिसतो आहे. असेही सामानातून सांगण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक झाली की अनेक आमदार शरद पवारांकडे येतील”, रोहित पवारांचा मोठा दावा
हेही वाचा…लोकसभेच्या ‘या’ १७ जागांवर अजित पवार आग्रही, महायुतीत किती अन् कोणत्या जागा मिळणार ?
हेही वाचा…जागावाटपावरून महाविकास आघाडीत भांडणं, प्रकाश आंबेडकरांचा दावा, उद्या महत्वाची बैठक
हेही वाचा…पुणे लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार ; चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार
हेही वाचा…मावळात अजित पवार गटाला मोठे खिंडार, तब्बल १३७ पदाधिकारी शरद पवार गटात करणार प्रवेश