मुंबई : महाविकास आघाडीसोबत आता महायुतीत देखील जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. आज केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून याबाबत चर्चा केली जाणार आहे. तर उद्या अजित पवार गटाची मुंबईत महत्वाची बैठक पार पडणार आहे. यात लोकसभेच्या १७ जागांबाबत अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महायुतीत अजित पवार गटाला किती जागा मिळणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…महायुती सरकारमध्ये सत्ताधारीच सुरक्षित नाहीत, भाजपच्या माजी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कर्जत येथील मेळाव्यात अजित पवारांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या चार जागांवर अगोदरच दावा सांगितला होता. यामध्ये बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या मतदारसंघात आपण उमेदवार देणार असे त्यांनी स्पष्ट केले होते. यातच आता आणखी काही जागांबाबत अजित पवार गटाकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर ‘मोदी का परिवार’ लिहिण्यास सुरूवात ; कारणही आलं समोर
धाराशिव, परभणी, जागेवर अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. सध्या या दोन्ही जागांवर ठाकरे गटाचे खासदार आहेत. यातच शिंदे गटाकडील बुलढाणा, हिंगोलीच्या जागांवरही लढण्याची इच्छा अजित पवार गटाने व्यक्त केली आहे. यासह भाजपजवळील गडचिरोली, माढा जागेवरही अजित पवार गट आग्रही असल्याचे बोललं जात आहे.
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी अजित पवार गट १० जागांवर आग्रही आहे. मात्र उद्याच्या बैठकीत एकूण १७ जागांवर बैठकीत चर्चा केली जाणार आहे. यामध्ये भंडारा-गोंदिया, नाशिक, दिंडोरी, मुंबई उत्तर पुर्ण या जागांवरही चर्चा केली जाणार आहे. यासह ईशान्य मुंबई, कोल्हापुर, अहमदनगरच्या जागेवरही पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. त्यामुळे महायुतीकडून अजित पवार गटाला आता किती आणि कोणत्या जागा मिळणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जागावाटपावरून महाविकास आघाडीत भांडणं, प्रकाश आंबेडकरांचा दावा, उद्या महत्वाची बैठक
हेही वाचा…पुणे लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार ; चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार
हेही वाचा…मावळात अजित पवार गटाला मोठे खिंडार, तब्बल १३७ पदाधिकारी शरद पवार गटात करणार प्रवेश
हेही वाचा…अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, भाजपच्या खासदाराने लोकसभेचे तिकीट केले परत
हेही वाचा…“इथल्या गद्दाराला आता आडवं करायचंच,” ठाकरेंनी मावळचा उमेदवार घोषित केला, बारणेंचं टेन्शन वाढलं