नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. परंतु उमेदवारी जाहीर होण्याआधी आणि नंतर आता भाजपच्या नेत्यांनी राजकारणातून सन्यांस घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी लोकसभेची उमेदवारी नाकारण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात नेमकं काय चालू आहे ? याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
हेही वाचा…“मिंधेंच्या जिल्ह्यात ‘लेक लाडकी’ फसली!” मुख्यमंत्र्यांवर ठाकरे गटाचा जोरदार घणाघात
भाजपचे उत्तर प्रदेशमधील बाराबंकीचे खासदार उपेंद्र सिंह रावत यांनी लोकसभेसाठी दिलेले तिकीट परत दिले आहेत. त्यांचा कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे तिकीट परत केले आहे. जोपर्यंत मी निर्दोषत्व सिद्ध करत नाही, तोपर्यंत मी निवडणुक लढविणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी खासदारांचे प्रतिनिधी दिनेश चंद्र रावत यांनी पोलिसांत तक्रार दिली असून हा व्हिडीओ खोटा असून एडिट केला आहे. पोलिसांनी याचा निष्पक्ष तपासा करावा अशी तक्रारीत मागणी केलीय. उपेंद्र सिंह राव यांनी हे व्हिडीओ २०२२-२३ मधील असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओवर एआयद्वारे माझा चेहरा लावण्यात आला आहे. मला बदनाम करण्यासाठी हे कृत्य केले गेले आहे. माझी प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न असून ज्या लोकांनी हे कृत केले आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“हाच खरा विश्वासघात म्हणत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात,”, म्हणाले….
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये परदेशी महिला दिसत असून यावर ३१ जानेवारी २०२२ अशी तारिख दिसत आहे. तर दुसरा व्हिडीओ मे २०२२ चा असल्याचे सांगण्यात आले आहे. याचबरोबर काही अन्य काही व्हिडीओ देखील व्हायरल झाले असून यावरून भाजपा रावत यांनी दिलेले तिकीट काढून घेऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या. याआधी भोजपुरी स्टार पवन सिंहने आसनसोलमधून निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. भाजपने पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती. या जागेवरून टीएमसी नेते शत्रुघ्न सिन्हा सध्या खासदार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“इथल्या गद्दाराला आता आडवं करायचंच,” ठाकरेंनी मावळचा उमेदवार घोषित केला, बारणेंचं टेन्शन वाढलं
हेही वाचा…महायुती सरकारमध्ये सत्ताधारीच सुरक्षित नाहीत, भाजपच्या माजी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हेही वाचा…भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर ‘मोदी का परिवार’ लिहिण्यास सुरूवात ; कारणही आलं समोर
हेही वाचा…“घड्याळ बंद पडले की काय ?” खासदार कोल्हेंची टिका, अजित पवार गटाने दिलं प्रत्युत्तर..
हेही वाचा…“परत आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा,” मनोज जरांगे पाटलांच्या सिनेमाचा टिझर तुफान व्हायरल