पुणे : मंचर येथील पोलिस स्टेशन इमारत, पोलिस अधिकारी व अंमलदार निवासस्थाने इत्यादी कामांचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांना देखील आमंत्रण दिले आहे. याची कार्यक्रम पत्रिका देखील जाहीर केली आहे. मात्र कार्यक्रमावर कोणतीही वेळ देण्यात आलेली नाही. यावरून अजित पवार गटातले आमदार अमोल मिटकरी आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
हेही वाचा….“शिवाजीराव आढळराव पाटील नको, महेश लांडगेंना उमेदवारी द्या,” कट्टर राजकीय विरोधकाने केली मोठी मागणी
मंचर येथील कार्यक्रमाची पत्रिका खासदार अमोल कोल्हे यांना देण्यात आली. मात्र त्यावर कोणतीही वेळ देण्यात न आल्याने खासदार कोल्हेंनी यावर शाब्दिक टिका केली. निमंत्रण मिळाले, परंतु निमंत्रण पत्रिकेत वेळच लिहिली नाही. घड्याळ बंद पडले की काय ? असं म्हणत खासदार कोल्हेंनी अजित पवार गटाला डिवचलं. तसेच पोलिस बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे. स्वागत तुतारी वाजवून करायला विसरू नका. असेही कोल्हेंनी म्हटले.
हेही वाचा…६२ देश फिरून भारतात आलेल्या ब्राझिलियन महिलेवर ७ जणांनी केला ब’ला’त्का’र, आव्हाडांची संतापजनक पोस्ट
अमोल कोल्हे यांच्या शाब्दिक टिकेला मिटकरी यांनी देखील प्रत्त्युत्तर दिलं आहे. आजकाल तुतारी वाले भाड्याने मिळतात आणि त्यांना वेळेचं बंधन नसतं साहेब. त्यांनी घड्याळाकडे न बघता अगोदरच तिथे उपस्थित राहायचं असतं. पोलीस बांधवांना तुतारी वाल्यांना वेळ सांगण्याची गरज वाटली नसेल. फार बारीक लक्ष देऊ नका. घड्याळ जोरात आहे. आपआपल्या तुताऱ्या उचला आता असेही मिटकरींनी म्हटलेय.
आजकाल “तुतारी” वाले भाड्याने मिळतात,आणि त्यांना वेळेचं बंधन नसतं साहेब 😄…त्यांनी “घड्याळाकडे” न बघता अगोदरच तिथे उपस्थित राहायचं असतं..!. पोलीस बांधवांना तुतारी वाल्यांना वेळ सांगण्याची गरज वाटली नसेल …फार बारीक लक्ष देऊ नका. घड्याळ जोरात आहे. आपआपल्या तुताऱ्या उचला आता. https://t.co/roZADe3MvH
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 4, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“परत आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा,” मनोज जरांगे पाटलांच्या सिनेमाचा टिझर तुफान व्हायरल
हेही वाचा…“मिंधेंच्या जिल्ह्यात ‘लेक लाडकी’ फसली!” मुख्यमंत्र्यांवर ठाकरे गटाचा जोरदार घणाघात
हेही वाचा…“हाच खरा विश्वासघात म्हणत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात,”, म्हणाले….
हेही वाचा…“सध्या देशात मोदींचीच हवा, आपल्याला काम करावं लागेल”, शिरूरमध्ये अजित पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…महायुतीत लोकसभांच्या ‘या’ जागावरून मोठा वाद, उद्या अमित शाहांच्या उपस्थितीत जागांचा तिढा सुटणार