मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात भाजपने जागावाटप केलं आहे. परंतु महाराष्ट्रातील महायुतीने अद्यापही जागावाटप केलेलं नाही. उद्या केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. तर या दौऱ्यावर अमित शाह महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा करून जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत. यातच महायुतीच्या आठ ते दहा जागांबाबत वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. अनेक जागांवर महायुतीच्या तिन्ही जागांवरून रस्सीखेच, दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळे उद्या यावर चर्चा करून वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.
हेही वाचा..अवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?
राज्यातील लोकसभेच्या ४८ लोकसभा मतदारसंघापैकी महायुतीत सध्या उत्तर पश्चिम मुंबई, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, रायगड, शिरूर, मावळ, नाशिक, रामटेक, पालघर, ठाणे, संभाजीनगर, धाराशीव, परभणी, यवतमाळ-वाशिम या जागांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हा राष्ट्रवादीचा असल्याने ती जागा आम्हालाच मिळावी, असा आग्रह अजित पवार गटाकडून केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हेही वाचा…अवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?
रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद सुरू आहे. तर नाशिकमध्येही विद्यमान खासदार हा शिवसेनेचा आहे. परंतु या जागेवर भाजपने आपला दावा सांगितला आहे. दुसऱ्या बाजूला मावळ आणि रायगडच्या जागेवरून भाजप-शिवसेना शिंदे गट- आणि अजित पवार गटात वाद सुरू आहे. तर यवतमाळ-वाशिममध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठा दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा..“शिवाजीराव आढळराव पाटील नको, महेश लांडगेंना उमेदवारी द्या,” कट्टर राजकीय विरोधकाने केली मोठी मागणी
हेही वाचा…६२ देश फिरून भारतात आलेल्या ब्राझिलियन महिलेवर ७ जणांनी केला ब’ला’त्का’र, आव्हाडांची संतापजनक पोस्ट
हेही वाचा…भाजपच्या मित्र पक्षाला शरद पवार लोकसभेची जागा देणार, सुप्रिया सुळेंनाही मोठी ताकद मिळणार
हेही वाचा…भाजपचा महाराष्ट्रावर डोळा, भाजपचे दोन दिग्गज आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
हेही वाचा…भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा , मोदींना तिसऱ्यांदा संधी, तर पहिल्या यादीत २८ महिलांचा संधी