नवी दिल्ली : जग भ्रंमतीवर निघालेल्या एका ब्राझिलियन बाईकर फर्नांडावर काल रात्री भारताच्या झारखंडमधील मकरकांढा भागात ७ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात या ब्राझिलियन महिलेने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत एक ट्विट केले आहे.
हेही वाचा…“बारणेंनी कमळावर निवडणुक लढवावी, मग भाजपकडे माणसं नाहीत का ?” सुनील शेळके यांचा भाजपला सवाल
जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत आपल्या ट्विटमध्ये असे म्हटलयं की, आम्हाला आमचीच लाज वाटते फर्नांडा, ६२ देश फिरून भारतात आलेली ब्राझिलियन बाईकर फर्नांडावर काल रात्री भारताच्या झारखंडमधील मकरकांडा भागात ७ जणांनी बलात्कार केला. ज्या नराधमांनी यांच्यासोबत हे घाणेरडे कृत्य केले आहे. त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी. अशी मागणी आव्हाडांनी केली आहे.
हेही वाचा…पुण्यातल्या तुळापुरातील कार्यक्रमात नाराजीनाट्य, अमोल कोल्हे अन् अशोक पवारांनी अर्ध्यावरूनच सोडले व्यासपीठ
दरम्यान, एक ब्राझिलियन जोडपे जगभ्रंमतीवर निघाले असता त्यांनी जवळपास ६२ देश फिरून भारतात आले आहेत. पीडित महिलेचे नाव फर्नांडा असून ती आपल्या पती सोबत भारतात आली आहे. यातच झारखंडमधील मकरकांडा भागात तिच्यावर सात जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्या पीडित महिलेलेने एक व्हिडीओ पोस्ट करून आपली हकीकत सांगितली आहे.
आम्हाला आमचीच लाज वाटते फर्नांडा !!
६२ देश फिरून भारतात आलेली ब्राझिलियन बाइकर फर्नांडावर काल रात्री भारताच्या झारखंडमधील मकरकांडा भागात ७ जणांनी बलात्कार केला.
ज्या नराधमांनी यांच्यासोबत हे घाणेरडे कृत्य केले आहे त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी.. pic.twitter.com/lM8oWsdjFO
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 4, 2024
a travelvlog couple trying to visit every country in the world decided to go to India as their latest destination.
11 hours ago they announced they were at the hospital because he had been beaten up and she had been gang raped by 7 men. pic.twitter.com/WNSd21TUi5
— pagliacci the hated 🌝 (@Slatzism) March 2, 2024
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या मित्र पक्षाला शरद पवार लोकसभेची जागा देणार, सुप्रिया सुळेंनाही मोठी ताकद मिळणार
हेही वाचा…भाजपचा महाराष्ट्रावर डोळा, भाजपचे दोन दिग्गज आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
हेही वाचा…भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा , मोदींना तिसऱ्यांदा संधी, तर पहिल्या यादीत २८ महिलांचा संधी
हेही वाचा..अवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?
हेही वाचाअवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?