मुंबई : उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सार्वधिक जागा असलेल्या महाराष्ट्राकडे केंद्रीय भाजपने लक्ष्य केंद्रीत केले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी किमान ४५ जागा जिंकण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून सातत्याने भाजपचे वरिष्ठ नेते भाजप दौरा करतांना दिसत आहेत. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.
हेही वाचा…“भाजपचा दुपट्टा दुसऱ्यांच्या गळ्यात टाकतील, अन् एक दिवस हेच गळ्यात घंटा बांधून रस्त्यावर फिरतील”
आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोन्ही दिग्गज नेते आज एकाच दिवशी राज्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नांदेडमार्गे तेलंगणातील आदिलाबादच्या सभेला जाणार आहेत. त्याआधी नांदेड येथे भाजपच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.
हेही वाचा..“महायुतीचा कार्यक्रम अन् व्यासपीठावर शरद पवारांचीच हवा,” फडणवीसांना डिवचणारा ‘तो’ व्हिडीओ आला समोर
तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव येथे सभा होणार आहे. साडेदहा वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. यातच विदर्भातील ६ लोकसभा मतदारसंघाचा अमित शाह आढावा घेणार असून अकोल्यात पदाधिकाऱ्यांची बैठक देखील होणार आहे. दुपारी १ वाजता बैठक आटोपून ते जळगावच्या सभेसाठी रवाना होणार आहेत. तर सांयकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा , मोदींना तिसऱ्यांदा संधी, तर पहिल्या यादीत २८ महिलांचा संधी
हेही वाचा..अवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?
हेही वाचाअवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?
हेही वाचा…“बारणेंनी कमळावर निवडणुक लढवावी, मग भाजपकडे माणसं नाहीत का ?” सुनील शेळके यांचा भाजपला सवाल
हेही वाचा…पुण्यातल्या तुळापुरातील कार्यक्रमात नाराजीनाट्य, अमोल कोल्हे अन् अशोक पवारांनी अर्ध्यावरूनच सोडले व्यासपीठ