पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यावरून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा दुपट्टा कधीही तयारच असतो, असे विधान केलं आहे. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावर खोचक टिप्पणी केली आहे.
हेही वाचा..लोकसभा निवडणुकीत मराठा समाज उभे करणार २५० उमेदवार, भाजपात गेलेल्या ‘या’ नेत्याला केलं टार्गेट
एकनाथ खडसे यांच्यासोबत अजूनही संपर्क झालेला नाही आहे. जेव्हा ते संपर्क करतील. त्यावर मी प्रतिक्रिया देईन. यातच मोदींच्या गॅंरटीला, विकासाला, सोबत देण्याकरीता जो जो भाजपमध्ये येईल. त्याचा स्वागत करण्यासाठी भाजपचा दुपट्टा तयार आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“निलेश लंकेंनी तुतारी किंवा मशाल हाती घेऊन निवडणुक लढवावी,” ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रत्येकांच दुपट्टा तयार असतो. एक दिवस असा येईल की, त्याच दुपट्ट्याने त्यांना फाशी घेण्याची वेळ येईल. अशी अवस्था बावनकुळे आणि त्यांच्या टीमची होईल. कारण इतर नेते त्यांच्या पक्षात जाणार मग हे कुठे असणार? यांचं अस्तित्व काय असणार ? हे सगळ्यांसाठीच दुपट्टा तयार ठेवतात. हे दुपट्टे दुसऱ्यांच्या गळ्यात टाकतील आणि यांच्या गळ्यामध्ये घंटा येईल आणि बैल म्हणून हे रस्त्यावर फिरतील. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“महायुतीचा कार्यक्रम अन् व्यासपीठावर शरद पवारांचीच हवा,” फडणवीसांना डिवचणारा ‘तो’ व्हिडीओ आला समोर
हेही वाचा…“नमो महारोजगार मेळाव्यातून तरूणांची फसवणूक,” विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…शरद पवारांसमोरच फडणवीसांकडून अजितदादांचं कौतूक, म्हणाले, अजितदादांचं काम म्हणजे…
हेही वाचासुनेत्रा पवारांनी घेतली थोपटेंची भेट, राजकीय हालचालींना वेग, मतांचं गणित ठरणार
हेही वाचा…“काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढू”, वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल