नांदेड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरील कथित अन्याय आणि त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजाने नांदेड जिल्ह्यात मोठा निर्णय घेतला आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत २५० पेक्षा अधिक उमेदवार उतरविण्याचा निर्णय नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर मतदारसंघात घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारला मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागणार आहे.
हेही वाचा…प्रति, महायुती सरकार, पत्रास कारण की…., विरोधकांनी महायुती सरकारला लिहिले पत्र, अनेक गोष्टींचा उल्लेख
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसमधून भाजपलात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातूनच आरक्षण लढ्याला आता नवे वळण लागण्याची शक्यता आहे. यातच अर्धापुर या तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीने गावतल्या दहा मराठा युवकांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर अर्धापुर तालुक्यातून २५० मराठा युवकांना निवडणुकीत उभे करण्याचे ठरवले असून अशा राजकीय कृतीतून राज्य सरकारविरूद्धता असंतोष व्यक्त केला जाणआर आहे.
हेही वाचा…नवनीत राणांच्या समोर अडचणींचा डोंगर, भाजपमध्ये करणार प्रवेश, तारीख अन वेळही ठरली
अर्धापुर येथे झालेल्या बैठकीला विविध नेत्यांसह सुमारे शंभर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मराठा आरक्षण आंदोलनात इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत अशोक चव्हाण यांच्यावर तुलनेत अधिक टिका केली जात होती. मराठा आरक्षणासाठी त्यांनी कॉंग्रेस पक्षात असताना भाजपच्या धोरणाचा समाचार घेतला. पण गेल्या महिन्यात अशोक चव्हाण यांनी प्रवेश करून त्यांनी आपले राजकीय स्थान सुरक्षित केले आहे. ही बाब सकल मराठा समाजाला खटकली आहे.
अशोक चव्हाण यांचा प्रभाव असलेल्या भोकर मतदारसंघात तीन तालुके समाविष्ट असून या तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची संख्या अधिक आहे. त्यांनी राजकीय लढाईचा प्रसार व प्रचार सुरू केला आहे. मराठा समाजातील कोणत्याही मोठ्या नेत्याने मतप्रदर्शन केलेले नाही किंवा लढाई पुकारणाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला नाही. याकडेही लक्ष वेधण्यात आले.
READ ALSO :
हेही वाचा…“निलेश लंकेंनी तुतारी किंवा मशाल हाती घेऊन निवडणुक लढवावी,” ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
हेही वाचा…“सगळ्या पक्षाला संपवून फक्त एकट्या भाजपला जिवंत राहायचं आहे का ?” कोकणाच्या जागेवरून भाजप अन् शिंदे गटात जुंपली
हेही वाचा…“शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची दलित युवकास बेदम मारहाण”, विरोधकांचा संताप, कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…भाजपची मॅरेथॉन बैठक, लोकसभेच्या १०० जागा ठरल्या, उमेदवारही जाहीर, मोदींसह, शाह मैदानात
हेही वाचा“नादाला लावलेली माणसं फार काळ राहत नाहीत”, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं