बुलढाणा : महायुती सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार मंत्री सातत्याने वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. यातच काल विधिमंडळाच्या लॉबितच शिंदे गटातील मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे दिसून आले. याचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहात दिसले. त्याआधीच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय गायकवाड यांचा भर मिरवणुकीत युवकाला बेदम मारहाण करतांना व्हिडीओ समोर आला आहे. त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टिका सुरू केली आहे.
हेही वाचा…मावळ लोकसभेवर वंचितचा दावा, स्वबळावर लढण्याचा दिला इशारा, आघाडीत बिघाडीची शक्यता
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मिरवणुकीत पोलिसांच्या काठीने एका युवकास बेदम झोडपल्याचा व्हिडीओ शुक्रवारी समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आमदाराच्या दादागिरीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावरून किती बोलायचं ? किती प्रकरणं रोज दाखवायची ? या व्हिडीओ तरूणाला अमानुष करणारा व्यक्ती हा काही मामुली गुंड नाही. मारहाण करणारा व्यक्ती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड. असं वडेट्टीवारांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“..म्हणून शरद पवारांचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं, ” राजकीय वर्तुळात एकच चर्चा
पुढे बोलतांना ते म्हणाले की, हवेत गोळीबार, एकमेकांवर गोळीबार, एकमेकांना लाथाबुक्क्या मारून सुरू असलेलं महायुतीच विकासच राजकारण आता जनतेला लाठ्या काठ्यानी झोडपुन काढण्यापर्यंत पोहचलं आहे. शेवटी हीच आहे मोदी की गॅरंटी असं म्हणत वडेट्टीवारांनी याप्रकराबाबत संताप व्यक्त केला आहे. परंतु पोलिसांत अद्यापही याबाबत कोणतीही तक्रार दाखल न करण्यात आल्याची प्रतिक्रिया बुलढाण्याचे पोलिस अधिक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे.
दरम्यान, संबंधित व्हिडीओ हा १९ फेब्रुवारीच्या शिवजयंती मिरवणुकीचा आहे. यामध्ये एका युवकास पोलिसांनी धरलेले असताना आमदार गायकवाड हे पोलिसाच्या हातातील काठी हिसकावून स्वत: च त्या युवकास बेदम मारहाण करीत आहेत. पोलिस त्यांचे कर्तव्य निभावत असताना लोकप्रतिनिधीने कायदा हातात घेऊन अशा प्रकारची दादागिरी केल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
किती बोलायचं?
किती प्रकरणं रोज दाखवायची?या व्हिडिओत तरुणाला अमानुष मारहाण करणारा व्यक्ती हा काही मामुली गुंड नाही.
मारहाण करणारा व्यक्ती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड.
हवेत गोळीबार, एकमेकांवर गोळीबार, एकमेकांना लाथाभुक्क्या मारून सुरू असलेलं… pic.twitter.com/uswO683Y7a
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 1, 2024
READ ALSO :
हेही वाचा…भाजपची मॅरेथॉन बैठक, लोकसभेच्या १०० जागा ठरल्या, उमेदवारही जाहीर, मोदींसह, शाह मैदानात
हेही वाचा“नादाला लावलेली माणसं फार काळ राहत नाहीत”, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…प्रति, महायुती सरकार, पत्रास कारण की…., विरोधकांनी महायुती सरकारला लिहिले पत्र, अनेक गोष्टींचा उल्लेख
हेही वाचा…नवनीत राणांच्या समोर अडचणींचा डोंगर, भाजपमध्ये करणार प्रवेश, तारीख अन वेळही ठरली
हेही वाचा…“सत्ताधारी पक्षातील अकरा साखरसम्राटांवर तब्बल १२०० कोटी रुपयांची खैरात, मात्र पंकजा मुंडेंवर पुन्हा अन्याय