नवी दिल्ली : भाजपने लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीसाठी गुरूवारी रात्री मुख्यालयामध्ये मॅरेथॉन बैठक घेतली होती. या बैठकीला त्या त्या राज्यांचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व केंद्रीय स्तरावरील नेते पहाटे साडी तीनपर्यंत उपस्थित होते. या बैठकीत भाजपने १०० उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली आहे. भाजपमधील सुत्रांनुसार पहिली यादी एक ते दोन दिवसांत येऊ शकते. या यादीत अनेक शॉंकिग बदल केले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“..म्हणून शरद पवारांचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं, ” राजकीय वर्तुळात एकच चर्चा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीत वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी , गांधीनगर मधून अमित शाह, लखनऊ मधून राजनाथ सिंहे, यांच्यासह बड्या नेत्यांची नावे असणार आहेत. तसेच २०१९ मध्ये भाजपने कमी फरकाने गमावलेल्या किंवा जिंकलेल्या कमकुवत जागांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
हेही वाचा…“महायुती सरकारमध्ये हमरी तुमरी,” शिंदे गटाचे दोन्ही नेत्यांमध्ये धक्काबुक्की, विरोधकांची सडकून टिका
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० जागा आणि भाजपला ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य मोदींनी ठेवले आहे. त्यासाठी भजापची तयारीही जोरदार सुरू आहे. यातच आता अनेक राज्यांमध्ये जागावाटपावर एकमत झाले आहे. उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाममध्ये भाजपच्या मित्रपक्षांसोबत जागावाटपाचा निर्णय झालाय. भाजप हरियाणातील सर्व दहा जागा उत्तर प्रदेशमधील ६ जागा सोडून सर्व जागा लढविणार आहे. अपना दल आणि आरएलडीला प्रत्येकी २ जागा आणि निषाद पक्ष आणि ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षाला प्रत्येकी एक जागा देण्यात येणार आहे.
दरम्यान, आसाममध्ये भाजप आपल्या मित्रपक्षांना तीन जागा, दोन जागा एजीपीसाठी आणि एक जागा युपीपीएलसाठी सोडली आहे. बिहारमध्ये जेडीयु,. चिराग पासवान यांची एलजेपी, पशुपती पारस यांची एलजेपी, उपेंद्र कुशवाह आणि जीतन राम मांझी यांच्याशी जागावाटपावर अंतिम बोलणी होणे बाकी आहे. तर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जागावाटपाची अंतिम चर्चा सुरूय.
READ ALSO :
हेही वाचा“नादाला लावलेली माणसं फार काळ राहत नाहीत”, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…प्रति, महायुती सरकार, पत्रास कारण की…., विरोधकांनी महायुती सरकारला लिहिले पत्र, अनेक गोष्टींचा उल्लेख
हेही वाचा…नवनीत राणांच्या समोर अडचणींचा डोंगर, भाजपमध्ये करणार प्रवेश, तारीख अन वेळही ठरली
हेही वाचा…“सत्ताधारी पक्षातील अकरा साखरसम्राटांवर तब्बल १२०० कोटी रुपयांची खैरात, मात्र पंकजा मुंडेंवर पुन्हा अन्याय
हेही वाचा…मावळ लोकसभेवर वंचितचा दावा, स्वबळावर लढण्याचा दिला इशारा, आघाडीत बिघाडीची शक्यता