मुंबई : सध्या रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा असून ती जागा आम्हालाच मिळावी, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच या जागेसाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेची जागा भाजप लढवणार असे जाहीर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. यातच आता शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी मोठं विधान केलं आहे. त्यावरून हा वाद आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“सत्ताधारी पक्षातील अकरा साखरसम्राटांवर तब्बल १२०० कोटी रुपयांची खैरात, मात्र पंकजा मुंडेंवर पुन्हा अन्याय
लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे. असे नारायण राणे यांनी म्हटले होतं.
त्यावर रायगडच्या जागेबाबत तुम्ही असचं सांगणार, रत्नागिरी-सिंधुदूर्गच्या जागेवरूनही तुम्ही असचं करणार, असं होत नाही. ही जागा शिवसेनेची आहे. सगळ्या पक्षाला संपवून फक्त एकट्या भाजपला जिवंत राहायचं आहे का ? असा निष्कर्ष त्यातून निघेल. ते कसं आहे. आपण दोघे भाऊ-भाऊ. तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू. असं होता कामा नये. त्यामुळे कुठल्याही परिस्थिती रत्नागिरी-सिंधुदूर्गाची जागा आम्ही सोडणार नाही. ती आमच्या हक्काची जागा असून ती आम्ही लढवणारच असा निर्धार देखील रामदास कदम यांनी केला आहे.
हेही वाचा…मावळ लोकसभेवर वंचितचा दावा, स्वबळावर लढण्याचा दिला इशारा, आघाडीत बिघाडीची शक्यता
अशा आरोपांवर काय उत्तर द्यायचं ? असं उत्तर देणारी जी टिम आहे. त्या टिमचं देखील मी सदस्य नाही. त्याच्यावर काही टिप्पणी देणार नाही. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. या तिन्ही पक्षात जो संघर्ष आहे. तो आता दिसतोच आहे. परंतु खरा पिक्चर अभी बाकी आहे. जशी जशी निवडणुक जवळ येईल तसा तसा संघर्ष बघायला मिळेल अशी खोचक टिप्पणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची दलित युवकास बेदम मारहाण”, विरोधकांचा संताप, कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…भाजपची मॅरेथॉन बैठक, लोकसभेच्या १०० जागा ठरल्या, उमेदवारही जाहीर, मोदींसह, शाह मैदानात
हेही वाचा“नादाला लावलेली माणसं फार काळ राहत नाहीत”, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…प्रति, महायुती सरकार, पत्रास कारण की…., विरोधकांनी महायुती सरकारला लिहिले पत्र, अनेक गोष्टींचा उल्लेख
हेही वाचा…नवनीत राणांच्या समोर अडचणींचा डोंगर, भाजपमध्ये करणार प्रवेश, तारीख अन वेळही ठरली