बारामती : महायुतीकडून बारामतीची जागा अजित पवार गटाला दाट शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात काम करण्यास सुरूवात करून दिली आहे. यातच महायुतीकडून बारामतीची जागा आम्हाला मिळाल्यास याठिकाणी सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येईल.असं विधान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं आहे. त्यानुसार आता बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत अटळ झाली आहे. त्यानुसार आता सुनेत्रा पवार बारामतीत चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत.
हेही वाचा…भाजपची मॅरेथॉन बैठक, लोकसभेच्या १०० जागा ठरल्या, उमेदवारही जाहीर, मोदींसह, शाह मैदानात
यातच आता सुनेत्रा पवार यांनी मतदारसंघात हालचाली सुरू केल्या असून त्यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे. यातच अनंत थोपटे हे शरद पवारांचे कट्टर विरोधक मानले जातात. शरद पवार यांचे विरोधक म्हणून त्यांना कॉंग्रेसने केंद्रामध्ये मान दिला होता. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाला विरोध करत शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन केली. त्यानंतरच्या काळात तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अनंतराव थोपटे यांना पवार यांच्या विरोधात मोठे बळ दिले होते.
हेही वाचा…“नादाला लावलेली माणसं फार काळ राहत नाहीत”, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
यातच एक महिन्यावर लोकसभेची निवडणुक ठेपली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भोर विधानसभा महत्वाचा राहिला आहे. कारण या मतदारसंघातून ज्यांच्या पारड्यात मत पडतात. तो उमेदवार विजयी होतो, असा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. त्याआधी सुप्रिया सुळे यांनी देखील अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. आता भोर दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार यांनी देखील थोपटे कुटुंबीयांची भेट घेतलीय. यावेळी आमदार संग्राम थोपटे, पत्नी स्वरूपा थोपटे आणि पृथ्वीराज थोपटे उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढू”, वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा..लोकसभा निवडणुकीत मराठा समाज उभे करणार २५० उमेदवार, भाजपात गेलेल्या ‘या’ नेत्याला केलं टार्गेट
हेही वाचा…“निलेश लंकेंनी तुतारी किंवा मशाल हाती घेऊन निवडणुक लढवावी,” ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
हेही वाचा…“सगळ्या पक्षाला संपवून फक्त एकट्या भाजपला जिवंत राहायचं आहे का ?” कोकणाच्या जागेवरून भाजप अन् शिंदे गटात जुंपली
हेही वाचा…“शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची दलित युवकास बेदम मारहाण”, विरोधकांचा संताप, कारवाई करण्याची मागणी