बारामती : राज्य सरकारचा नमो महारोजगार मेळावा बारामतीत होत आहे. या मेळाव्याच्या आधी शरद पवारांना निमंत्रण न दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर थेट शरद पवारांनी राजकीय खेळी करत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं. परंतु हे आमंत्रण नाकारण्यात आलं. तर शरद पवारांचंही नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आलं. त्यानंतर या कार्यक्रमाकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. यातच कार्यक्रम महायुतीचा परंतु शरद पवार व्यासपीठावर आल्यानंतर लोकांनी एकच जल्लोष केला. त्याचा व्हिडीओही आता समाज माध्यमांवर जोरात फिरू लागला आहे.
हेही वाचा…“निलेश लंकेंनी तुतारी किंवा मशाल हाती घेऊन निवडणुक लढवावी,” ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यातच व्यासपीठावर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस तसेच इतर मंत्रिमंडळातील नेत्यांना वाकून नमस्कार केला. तर अजितदादा आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे सुप्रिया सुळे यांनी पाठ फिरवली. तो व्हिडीओ समोर येताच आता पुन्हा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यातच शरद पवार व्यासपीठावर येताच खाली बसलेल्या लोकांनी एकच जल्लोष केला. त्यावरून कार्यक्रम महायुतीचा पण बारामतीत शरद पवारांनीच हवा केली असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
हेही वाचा…“सगळ्या पक्षाला संपवून फक्त एकट्या भाजपला जिवंत राहायचं आहे का ?” कोकणाच्या जागेवरून भाजप अन् शिंदे गटात जुंपली
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेत्रे किरण माने यांनी शरद पवारांचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं लिहलंय की, आपल्या हद्दीत येऊन पोकळ माज करू पहाणार्या शत्रुच्या छावणीत घुसून त्याचा धुव्वा कसा उडवायचा ही जिगरबाज वृत्ती पवार साहेबांकडूनच शिकावी ! पवारांच्या वयात, या स्टेजवर बसलेल्या गावगुंडांची काय दयनीय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी. असं म्हणत त्यांनी राज्य सरकारसह अजित पवारांनीही डिवचलं आहे.
दरम्यान, पुढे ते असेही म्हणाले की, साहेबांना पाहून जनतेने उत्स्फूर्तपणे केलेला जल्लोष प्रत्येकाच्या नशिबात नाही येत. साहेबांच्या सभेत यातल्या एकानेही अशी अचानक स्टेजवर जायची हिंमत करावी. ‘जरांगेंनी दिलेल्या शिव्या बर्या होत्या’ असं म्हणायची वेळ येईल. ही ‘चाल’ पावसातल्या सभेपेक्षा शंभरपट खतरनाक परीणाम करणार आहे यावेळी ! बख्खळ आले आन् मायंदाळ गेले गड्याहो… पवारसाहेब हा महाराष्ट्राच्या जनतेच्या काळजातला विषय हाय… थंड घ्या. असाही टोला त्यांनी लगावला.
आपल्या हद्दीत येऊन पोकळ माज करू पहाणार्या शत्रुच्या छावणीत घुसून त्याचा धुव्वा कसा उडवायचा… ही जिगरबाज वृत्ती पवारसाहेबांकडूनच शिकावी !
पवारांच्या वयात, या स्टेजवर बसलेल्या गावगुंडांची काय दयनीय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी 😜😂साहेबांना पाहून जनतेने उत्स्फूर्तपणे… pic.twitter.com/Q9tfj61Nzq
— Kiran Mane (@kiranmane7777) March 2, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“नमो महारोजगार मेळाव्यातून तरूणांची फसवणूक,” विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…शरद पवारांसमोरच फडणवीसांकडून अजितदादांचं कौतूक, म्हणाले, अजितदादांचं काम म्हणजे…
हेही वाचासुनेत्रा पवारांनी घेतली थोपटेंची भेट, राजकीय हालचालींना वेग, मतांचं गणित ठरणार
हेही वाचा…“काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढू”, वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा..लोकसभा निवडणुकीत मराठा समाज उभे करणार २५० उमेदवार, भाजपात गेलेल्या ‘या’ नेत्याला केलं टार्गेट