मावळ : मागील काही दिवसांपासून पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच होतांना दिसत आहेत. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी 2024 साठी आपली उमेदवारी स्वत: च जाहीर केली आहे. तर दुसऱ्या बाजूला बाळा भेगडे यांनी ही जागा भाजपला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातच आता मावळातून श्रीरंग बारणे यांनी कमळाच्या चिन्हांवर निवडणुक लढवावी, अशी मागणी भाजपकडून केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटातले आमदार सुनील शेळके यांन भाजपला खोचक सवाल केलाय.
हेही वाचा…सुनेत्रा पवारांनी घेतली थोपटेंची भेट, राजकीय हालचालींना वेग, मतांचं गणित ठरणार
आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे आणि अजित पवार गटातील अनेक नेते कमळाच्या चिन्हांवर निवडणुका लढतील अशी टिका विरोधी पक्ष करीत आहेत. यातच आता मावळमधून श्रीरंग बारणे यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवावी, अशी मागणी होत आहेत. यावरून श्रीरंग बारणे यांनी भाजपकडून निवडणुक लढवावी, असं म्हटलं जात आहे तर भाजपकडे माणसं नाहीत का ? असा सवाल आमदार सुनील शेळके यांनी भाजपला केला आहे.
हेही वाचा…“काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढू”, वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
मावळच्या जागेवर याआधीही सुनील शेळके यांनी दावा सांगितला आहे. महायुतीतून मावळची जागा अजित पवार गटाला मिळावी, यासाठी शेळके आग्रही असल्याचं दिसून येत आहे. यातच आता श्रीरंग बारणे यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवावी, अशी चर्चा आहे. यातच भाजपकडे इच्छूक उमेदवार असतांना आयात उमेदवार दिला आणि तो मतदार स्विकारतीलच यावर विश्वास आहे का ? असा सवालही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यातल्या तुळापुरातील कार्यक्रमात नाराजीनाट्य, अमोल कोल्हे अन् अशोक पवारांनी अर्ध्यावरूनच सोडले व्यासपीठ
हेही वाचा…“भाजपचा दुपट्टा दुसऱ्यांच्या गळ्यात टाकतील, अन् एक दिवस हेच गळ्यात घंटा बांधून रस्त्यावर फिरतील”
हेही वाचा..“महायुतीचा कार्यक्रम अन् व्यासपीठावर शरद पवारांचीच हवा,” फडणवीसांना डिवचणारा ‘तो’ व्हिडीओ आला समोर
हेही वाचा…“नमो महारोजगार मेळाव्यातून तरूणांची फसवणूक,” विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…शरद पवारांसमोरच फडणवीसांकडून अजितदादांचं कौतूक, म्हणाले, अजितदादांचं काम म्हणजे…