ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वर्षभरात ८ हजारांहून अधिक मुलींचा जन्म झाला असला तरी शासनाच्या लेक लाडली योजनेचा लाभ केवळ ५६१ मुलींनाच मिळाला आहे. यामुळे या योजनेला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. आधार कार्ड नसणे, तांत्रिक बिघाडाअभावी तसेच जनजागृती झालेली नसल्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून आता ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…भाजपच्या मित्र पक्षाला शरद पवार लोकसभेची जागा देणार, सुप्रिया सुळेंनाही मोठी ताकद मिळणार
घटनाबाह्य मुख्यमंत्री मिंधेंच्या जिल्ह्यात लेक लाकडी योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे. गेल्या वर्षभरात ठाण्याच्या ग्रामीण भागात ८ हजार ९३९ मुली जन्मल्या. त्यापैकी केवळ १ हजार १५६ मुलींचे योजनेसाठी अर्ज आले. पण त्यातल्या केवळ ५६१ मुली यासाठी पात्र ठरल्या आहेत. तांत्रिक अडचणी सोडवण्यात आलेलं अपयश आणि जनजागृतीच्या अभावी हजारो मुली योजनेपासून वंचित आहेत. स्वत : च्या जिल्ह्याकडे लक्ष द्यायला मिंधेंना वेळ नाही. एकीकडे हे घटनाबाह्य सरकार करोडो रूपये खर्च करून शासन आपल्या दारीचा गाजावाजा करतं पण हे दार नेमकं कुणाचं असा आता प्रश्न पडलाय. असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
हेही वाचा…भाजपचा महाराष्ट्रावर डोळा, भाजपचे दोन दिग्गज आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
माझी कन्या भाग्यश्री योजनेत सुधारणा करून १ एप्रिल २०२३ पासून लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्युदर कमी करणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शुन्यावर आणणे आणि बाल विवाह रोखणे अशी ही योजना राबविण्यामागचा हेतू आहे. १ एप्रिल २०२४ रोजी या योजनेला एक वर्ष पुर्ण होत आहे. मात्र गेल्या वर्षभरात या योजनेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हाच खरा विश्वासघात म्हणत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात,”, म्हणाले….
हेही वाचा…“सध्या देशात मोदींचीच हवा, आपल्याला काम करावं लागेल”, शिरूरमध्ये अजित पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…महायुतीत लोकसभांच्या ‘या’ जागावरून मोठा वाद, उद्या अमित शाहांच्या उपस्थितीत जागांचा तिढा सुटणार
हेही वाचा..“शिवाजीराव आढळराव पाटील नको, महेश लांडगेंना उमेदवारी द्या,” कट्टर राजकीय विरोधकाने केली मोठी मागणी
हेही वाचा…६२ देश फिरून भारतात आलेल्या ब्राझिलियन महिलेवर ७ जणांनी केला ब’ला’त्का’र, आव्हाडांची संतापजनक पोस्ट