पुणे : सध्या देशाची हवा ही मोदींच्या बाजूने आहेत. छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान हे राज्य भाजपसोबत गेले आहेत. आम्ही एनडीएमध्ये असून आमची प्रत्येकाची विचारधारा ही वेगवेगळी आहे. आम्ही एनडीएसोबत गेलो असलो तरी आम्ही आमची विचारधारा बदलली नाही. त्यामुळे केंद्रात ज्यांची सत्ता आहे. त्यांच्या बाजूच्या विचाराचा खासदार गेला तर आपल्याला मदत होणार आहे. असं विधान आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. आज शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा , मोदींना तिसऱ्यांदा संधी, तर पहिल्या यादीत २८ महिलांचा संधी
पुढे बोलतांना त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. परवा अमोल कोल्हे कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघून गेले. यावर बोलतांना ते म्हणाले की, काल मला हळूच एकाने कानात सांगितले की, निलेश लंके यांच्या मतदारसंघात काही तरी नाटक सुरू आहे. त्यामुळे मला जावं लागेल. असं म्हणत आमदार अशोक पवार यांच्या मतदारसंघात मीच मदत केली आहे. त्याला केव्हाही उठवून म्हटलं तरी तो माझाच नाव घेईल. पुणे जिल्ह्याची कामं होण्यासाठी मंत्रिमंडळात आपली बाजू भक्कमपणे मांडत आलो आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच इतर कुठल्याही इमारती माझ्या काळातच झाल्या आहेत. पुण्यात कामगार भवन, सहकार भवन, तसेच इतर अशा अनेक इमारतीचं काम माझ्या नेतृत्वाखाली सुरू झालं आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा..अवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांनी राजकारणालाच ठोकला रामराम, भाजपमध्ये नेमकं काय घडतंय ?
आज देशपातळीवर मोदींच्या इतकी धमक असलेला नेता कुठेही दिसत नाही. दुसऱ्या बाजूला अनेक वाद सुरू आहेत. नेता जर मजबुत असेल तर देश अतिशय मजबूतीने जात असतो. मोदींमुळे देशाचा विकास होत आहे. त्यामुळेच आपण त्यांच्या विचारांचा खासदार निवडून द्यायचा आहे. महायुती सरकार तुमच्यासाठी काम करत आहे. असेही अजित पवार यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीत लोकसभांच्या ‘या’ जागावरून मोठा वाद, उद्या अमित शाहांच्या उपस्थितीत जागांचा तिढा सुटणार
हेही वाचा..“शिवाजीराव आढळराव पाटील नको, महेश लांडगेंना उमेदवारी द्या,” कट्टर राजकीय विरोधकाने केली मोठी मागणी
हेही वाचा…६२ देश फिरून भारतात आलेल्या ब्राझिलियन महिलेवर ७ जणांनी केला ब’ला’त्का’र, आव्हाडांची संतापजनक पोस्ट
हेही वाचा…भाजपच्या मित्र पक्षाला शरद पवार लोकसभेची जागा देणार, सुप्रिया सुळेंनाही मोठी ताकद मिळणार
हेही वाचा…भाजपचा महाराष्ट्रावर डोळा, भाजपचे दोन दिग्गज आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर