मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. संघर्षयोद्धा असं चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपुर्वीच करण्यात आली होती. आता या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा…६२ देश फिरून भारतात आलेल्या ब्राझिलियन महिलेवर ७ जणांनी केला ब’ला’त्का’र, आव्हाडांची संतापजनक पोस्ट
मागील काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केली. त्यानुसार राज्य सरकारने काही निर्णय देखील घेतले आहे. यातच आता मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास संघर्षयोद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून येत्या २६ एप्रिल रोजी संपुर्ण महाराष्ट्रभर समोर येणार आहे.
हेही वाचा…भाजपच्या मित्र पक्षाला शरद पवार लोकसभेची जागा देणार, सुप्रिया सुळेंनाही मोठी ताकद मिळणार
संघर्ष योद्धा या चित्रपटाचं बरचं शुटिंग जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत झालं आहे. अभिनेता रोहन पाटील हा मनोज जरांगे पाटील यांच्या भुमिकेत आहे. तर गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. तर पटकथा आणि संवाद सुधीर निकम यांचे आहेत. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री सुरभी हांडे, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसतील.
बायकोला सांगतानाच सांगितलंय आलो तर तुआ ( तुझा ) गेलो तर समाजाचा हा डायलॉंग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. आता या चित्रपटाचा टिझर समोर आला असून मराठा आंदोलनाची झलक पाहायला मिळाली आहे. यामध्ये जाहीर सभा, बाईक रॅली, एक मराठा, लाख मराठा च्या घोषणा हे सगळं पाहायला मिळतं.
View this post on Instagram
READ ALSO :
हेही वाचा…“मिंधेंच्या जिल्ह्यात ‘लेक लाडकी’ फसली!” मुख्यमंत्र्यांवर ठाकरे गटाचा जोरदार घणाघात
हेही वाचा…“हाच खरा विश्वासघात म्हणत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात,”, म्हणाले….
हेही वाचा…“सध्या देशात मोदींचीच हवा, आपल्याला काम करावं लागेल”, शिरूरमध्ये अजित पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…महायुतीत लोकसभांच्या ‘या’ जागावरून मोठा वाद, उद्या अमित शाहांच्या उपस्थितीत जागांचा तिढा सुटणार
हेही वाचा..“शिवाजीराव आढळराव पाटील नको, महेश लांडगेंना उमेदवारी द्या,” कट्टर राजकीय विरोधकाने केली मोठी मागणी