नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार चोर है, असं म्हणत हल्ला चढवला होता. या टिकेला भाजपकडून प्रत्युत्तर देत मै भी चौकीदार ही मोहीम देशभर राबवण्यात आली होती. भाजपच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावासमोर मै भी चौकीदार असे लिहिलं होतं. त्यानंतर आता २०२४ च्याही निवडणुकीत भाजपने भावनिक अस्त्र वापरण्यात सुरूवात केली आहे.
हेही वाचा…महायुतीत लोकसभांच्या ‘या’ जागावरून मोठा वाद, उद्या अमित शाहांच्या उपस्थितीत जागांचा तिढा सुटणार
बिहारमधील पाटणा येथे इंडिया आघाडीची महाविराट सभा पार पडली. या सभेत राजदचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालु प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली. नरेंद्र मोदी हे हिंदू नाहीत. कारण प्रत्येक हिंदू आपल्या आईचा मृत्यू झाल्यानंतर केस आणि दाढी काढतो. मात्र मोदींनी असं केलं नाही. ते घराणेशाही म्हणत लोकांवर टिका करतात, मात्र त्यांना कुटंबच नाही. असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले होते. त्यावर आता देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती माझं कुटुंब आहे. ज्याचा कोणी नाही त्याचा मोदी आहे. आता संपुर्ण देशही आम्ही मोदींचे कुटुंब आहोत. असे म्हणतोय. अशा शब्दात मोदींनी मै हू मोदी का परिवार अशी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी घोषणा दिलीय.
हेही वाचा….“शिवाजीराव आढळराव पाटील नको, महेश लांडगेंना उमेदवारी द्या,” कट्टर राजकीय विरोधकाने केली मोठी मागणी
नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर आता भाजपच्या सर्व नेत्यांच्या नावासमोर मोदी का परिवार असे लिहिण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंज्ञी अमित शाह यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. तुम्हाला कुटुंबच नाही अशी टिका करणाऱ्या विरोधकांना हा देश हेच माझं कुटुंब आहे, असं म्हणत भावनिक अस्त्र वापरत नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Addressing a massive public meeting in Adilabad. People of Telangana connect with the BJP’s development agenda.https://t.co/p0zzQ47Q9D
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“घड्याळ बंद पडले की काय ?” खासदार कोल्हेंची टिका, अजित पवार गटाने दिलं प्रत्युत्तर..
हेही वाचा…“परत आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा,” मनोज जरांगे पाटलांच्या सिनेमाचा टिझर तुफान व्हायरल
हेही वाचा…“मिंधेंच्या जिल्ह्यात ‘लेक लाडकी’ फसली!” मुख्यमंत्र्यांवर ठाकरे गटाचा जोरदार घणाघात
हेही वाचा…“हाच खरा विश्वासघात म्हणत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात,”, म्हणाले….
हेही वाचा…“सध्या देशात मोदींचीच हवा, आपल्याला काम करावं लागेल”, शिरूरमध्ये अजित पवारांचं मोठं विधान