मावळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आज त्यांची मावळ लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच या इथल्या गद्दार खासदाराला आता आडावा करण्याची वेळ आली आहे. असे म्हणत त्यांनी संजोग वाघेरे यांना निवडून द्या. असे आवाहनही ठाकरे यांनी लोकांना केलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात बारणे विरूद्ध वाघेरे असा सामना होण्याची दाट शक्यता आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय आहे.
हेही वाचा…“हाच खरा विश्वासघात म्हणत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात,”, म्हणाले….
इथल्या खासदाराने गद्दारी केलेलीच आहे. त्याला तर आडावा करायचाच. परंतु दुसऱ्या बाजूला सरकार कुणाचंही येऊ आपल्याकडे लोक घेत आहेत. त्यांचं आता दुकाम कायमचंच बंद करून टाकायचं आहे.आम्ही तुम्हालाच निवडून देतो, परंतु संजोग वाघेरे यांनी सांगितलं की याठिकाणी ग्रामीण रूग्णालय नाहीत. त्यामुळे मला लाज वाटते की हा गद्दार कोणे एकेकाळी शिवसेनेने निवडून दिला होता. परंतु त्याला ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न सोडवता आला नाही. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर ठाकरेंनी जोरदार घणाघात चढवला.
हेही वाचा…“सध्या देशात मोदींचीच हवा, आपल्याला काम करावं लागेल”, शिरूरमध्ये अजित पवारांचं मोठं विधान
दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी ज्यांनी विकासकामांचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी एकही काम याठिकाणी केलेलं नाही. पाण्याची समस्या आहेच, परंतु याठिकाणी एकही आरोग्य केंद्र, रूग्णालय नाही. पनवेल शहरात सामाविष्ट झालेल्या गावांमध्ये कराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. असे अनेक प्रश्न या शहरात सध्या निर्माण झाले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यात तयार आहे. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात संघटन म्हणून पुढील काळात काम करणार आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या विचाराचा उमेदवार निवडून येईल. असं संजोय वाघेरे यांनी म्हटलेय.
READ ALSO :
हेही वाचा…महायुती सरकारमध्ये सत्ताधारीच सुरक्षित नाहीत, भाजपच्या माजी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हेही वाचा…भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर ‘मोदी का परिवार’ लिहिण्यास सुरूवात ; कारणही आलं समोर
हेही वाचा…“घड्याळ बंद पडले की काय ?” खासदार कोल्हेंची टिका, अजित पवार गटाने दिलं प्रत्युत्तर..
हेही वाचा…“परत आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा,” मनोज जरांगे पाटलांच्या सिनेमाचा टिझर तुफान व्हायरल
हेही वाचा…“मिंधेंच्या जिल्ह्यात ‘लेक लाडकी’ फसली!” मुख्यमंत्र्यांवर ठाकरे गटाचा जोरदार घणाघात