भंडारा : महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झालाय की नाही, याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. कारण लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपाचा अजूनही फॉर्म्युला ठरलेला नाहीय. काही जागांवरून अजूनही महाविकास आघाडीत वाद सुरू आहे. यातच वंचितचे प्रमुक प्रकाश आंबेडकर यांची मागील काही दिवसांची भूमिकाही काही संशयाची ठरत आहेत. यातच आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु त्यांचे भांडण संपले की आमच्याशी त्यांची चर्चा सुरू होईल. असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर ‘मोदी का परिवार’ लिहिण्यास सुरूवात ; कारणही आलं समोर
भंडारा येथे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आदिवासी बहुजन अधिकार महासभा पार पडली. या सभेतून प्रकाश आंबेडकर यांनी विविध घटनांवर भाष्य केले. कॉंग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये १० जागांवरून भांडण चालू आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे ५ जागांवरून भांडण चालू आहे म्हणजे ४८ जागांपैकी १५ जागांवर यांचे भांडण चालू आहे आणि दर दिवशी माध्यमावर हे चाललं आहे की, वंचित बहुजन आघाडीने किती जागा मागितल्या हेच कळत नाही. ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही. त्यांचे भांडण संपले की आमच्याशी त्यांची चर्चा सुरू होईल. असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“घड्याळ बंद पडले की काय ?” खासदार कोल्हेंची टिका, अजित पवार गटाने दिलं प्रत्युत्तर..
दरम्यान, राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत समन्वय झाला आहे. परंतु काही अशा जागा आहेत त्याठिकाणी कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत अजूनही तोडगा निघालेला नाही. दुसऱ्या बाजूला वंचितनेही टोकाची भूमिका घेत काही मतदारसंघावर दावा सांगितला आहे. यातच आता उद्या महाविकास आघाडीची जागावाटपासाठी बैठक होणार असून वंचितला देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुणे लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार ; चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार
हेही वाचा…मावळात अजित पवार गटाला मोठे खिंडार, तब्बल १३७ पदाधिकारी शरद पवार गटात करणार प्रवेश
हेही वाचा…अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, भाजपच्या खासदाराने लोकसभेचे तिकीट केले परत
हेही वाचा…“इथल्या गद्दाराला आता आडवं करायचंच,” ठाकरेंनी मावळचा उमेदवार घोषित केला, बारणेंचं टेन्शन वाढलं
हेही वाचा…महायुती सरकारमध्ये सत्ताधारीच सुरक्षित नाहीत, भाजपच्या माजी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र