मावळ : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गट चांगलाच सक्रीय झाला आहे. अनेक ठिकाणी नेत्यांच्या गाठीभेटी, नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सूरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटात देखील प्रचंड नाराजी दिसून येत आहे. यातच आता मावळमधील १३७ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेल्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने मावळात अजित पवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“परत आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा,” मनोज जरांगे पाटलांच्या सिनेमाचा टिझर तुफान व्हायरल
काही दिवसापुर्वी मावळ मतदारसंघात जिल्ह्याध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे अजित पवार गटातील १३७ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले होते. त्यानंतर आता याच पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मावळात मोठे खिंडार पडणार आहे. यातच ७ मार्च रोजी शरद पवार यांची मावळ येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार असून या मेळाव्यात हे पदाधिकारी शरद पवार गटात दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“मिंधेंच्या जिल्ह्यात ‘लेक लाडकी’ फसली!” मुख्यमंत्र्यांवर ठाकरे गटाचा जोरदार घणाघात
दरम्यान, दोन ते तीन दिवसांपुर्वी काही वरिष्ठ नेत्यांना डावलून काही नवख्या नेत्याला संधी देण्यात आली होती. त्यानंतर १३७ कार्यकर्त्यांनी सामुहिक राजीनामे दिले होते. यानंतर मावळात एकच खळबळ उडाली होती.
राष्ट्रवादी मावळ तालुका पक्षनेता यांनी लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिले आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप लोणावळा युवक शहाराध्यक्ष विनोद होगले यांनी केला आहे. त्यामुळे विनोद होगले यांच्यासह राष्ट्रवादीच्या १३७ पदाधिकारी महिला, युवती तरूण यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाच्या मावळमधील आणि पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज ज्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
विनोद होगले यांचं लोणावळा युवक शहाराध्यक्ष पद काढून मंगेश मावकर यांच्याकडे देण्यात आले आहे. परंतु त्यांना काहीही अनुभव नाही असं असतानाही त्यांना संधी दिली आहे. आम्ही राष्ट्रवादी सोबत होतो. मात्र आम्हाला निर्णय घ्यावा लागला. लवकरच पुढचं पाऊल उचणार आहोत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे मावळचे आमदार सुनील शेळके यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, लोणावळ्यात भुंकप होताच राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी लगेच धाव घेतलीय. त्यांनी राजीनामा दिलेल्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. त्यामुळे राजीनामा दिलेले कार्यकर्ते लवकरच निर्णय घेणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, भाजपच्या खासदाराने लोकसभेचे तिकीट केले परत
हेही वाचा…“इथल्या गद्दाराला आता आडवं करायचंच,” ठाकरेंनी मावळचा उमेदवार घोषित केला, बारणेंचं टेन्शन वाढलं
हेही वाचा…महायुती सरकारमध्ये सत्ताधारीच सुरक्षित नाहीत, भाजपच्या माजी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हेही वाचा…भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर ‘मोदी का परिवार’ लिहिण्यास सुरूवात ; कारणही आलं समोर
हेही वाचा…“घड्याळ बंद पडले की काय ?” खासदार कोल्हेंची टिका, अजित पवार गटाने दिलं प्रत्युत्तर..