यवतमाळ : विद्यमान खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यात सध्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात रस्सीखेच सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संजय राठोड यांनी इच्छा व्यक्त केली आहे तर दुसऱ्या बाजूला आपणच भक्कम उमेदवार असल्याचा दावा भावना गवळी यांनी केला आहे. यातच भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातला वाद आणखी टोकाला गेलाय. यातच आता गवळी यांच्या समर्थकांनी राठोड यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा…मावळात अजित पवार गटाला मोठे खिंडार, तब्बल १३७ पदाधिकारी शरद पवार गटात करणार प्रवेश
मागील काही वर्षांपासून यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातीलच विद्यमान खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यात वाद सुरू आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये दोन्हीही नेते एकमेकांच्या कार्यक्रमाला येत नाहीत. तसेच अनेक कार्यक्रमांना एकमेकांना डावलण्यात येतंय. यातच आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राठोड यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे. तर दुसऱ्या बाजूला मेरी झांशी मै नही दुंगी असं म्हणत भावना गवळी यांनी देखील राठोड यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं आहे.
हेही वाचा…अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, भाजपच्या खासदाराने लोकसभेचे तिकीट केले परत
यातच यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी मंत्री संजय राठोड यांच्या दारवा शहरात पोस्टरबाजी केली. आम्हाला परभावाची भीती नाही, कारण आमचा जन्मच संघर्षातून झाला आहे. तसेच कहो दिल से ताईसाहेब फिर से अशा आशायचे पोस्टर संजय राठोड यांच्या मतदारसंघात लावण्यात आले आहेत. मत पुछ मेरे नाम की पहचान कहॉं तक है.. तुम बदनाम कर तेरी औकात जहॉं तक है. असेही काही पोस्टर लावण्यात आले आहेत. मात्र मात्र रातोरात ही बॅनर नगरपरिषदेने हटवले आहेत. बॅनरबाजी नेमकी कुणासाठी करण्यात आली होती. याची चर्चा आता राजकारणात सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नितीन गडकरींच्या पाठीत वार करण्याचे भाजपचे षडयंत्र , गडकरींना भाजपच्या पहिल्या यादीतून वगळले
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक झाली की अनेक आमदार शरद पवारांकडे येतील”, रोहित पवारांचा मोठा दावा
हेही वाचा…लोकसभेच्या ‘या’ १७ जागांवर अजित पवार आग्रही, महायुतीत किती अन् कोणत्या जागा मिळणार ?
हेही वाचा…जागावाटपावरून महाविकास आघाडीत भांडणं, प्रकाश आंबेडकरांचा दावा, उद्या महत्वाची बैठक
हेही वाचा…पुणे लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार ; चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार