नागपुर : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. परंतु राज्यात अजूनही जागावाटप ठरलेलं नाहीय. यातच महाविकास आघाडीसोबत आता वंचितही सामील झालं आहे.त्यामुळे जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यातच आता उद्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. वंचितने महाविकास आघाडीकडे २७ जागांसंदर्भात प्रस्ताव दिला आहे. उद्या वंचितला देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाईल, याची उत्सुकता सगळ्यांना लागून असतांना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार ; चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार
गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठक सुरू आहेत. मात्र जागावाटपाचा तिढा असूनही सुटलेला नाही. अशातच आता महाविकास आघाडीसोबत वंचितही आल्याने यात आणखी गुंता निर्माण झाला आहे. यातच वंचितसोबत शरद पवार आणि कॉंग्रेस चर्चा करीत आहेत. तर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी वंचितला चार ते पाच जागा देण्यात महाविकास आघाडी तयार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता वंचितच्या कोट्याला किती जागा येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…मावळात अजित पवार गटाला मोठे खिंडार, तब्बल १३७ पदाधिकारी शरद पवार गटात करणार प्रवेश
दरम्यान, भंडारा येथे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आदिवासी बहुजन अधिकार महासभा पार पडली. या सभेतून प्रकाश आंबेडकर यांनी विविध घटनांवर भाष्य केले. कॉंग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये १० जागांवरून भांडण चालू आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे ५ जागांवरून भांडण चालू आहे म्हणजे ४८ जागांपैकी १५ जागांवर यांचे भांडण चालू आहे आणि दर दिवशी माध्यमावर हे चाललं आहे की, वंचित बहुजन आघाडीने किती जागा मागितल्या हेच कळत नाही. ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही. त्यांचे भांडण संपले की आमच्याशी त्यांची चर्चा सुरू होईल. असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
याआधी वंचितला अकोला आणि अमरावतीची जागा देण्यात येईल. असे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. या जागांसह वंचित रामटेक, जालना, पुणे इत्यादी जागांबाबत आग्रही आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून वंचितला कोणत्या जागा दिल्या जाणार ? हे आगामी काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा“शिंदे गटाच्याच खासदार अन् मंत्र्यांत मोठा वाद,” भावना गवळीच्या समर्थकांची राठोड विरोधात पोस्टरबाजी
हेही वाचा…नितीन गडकरींच्या पाठीत वार करण्याचे भाजपचे षडयंत्र , गडकरींना भाजपच्या पहिल्या यादीतून वगळले
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक झाली की अनेक आमदार शरद पवारांकडे येतील”, रोहित पवारांचा मोठा दावा
हेही वाचा…लोकसभेच्या ‘या’ १७ जागांवर अजित पवार आग्रही, महायुतीत किती अन् कोणत्या जागा मिळणार ?
हेही वाचा…जागावाटपावरून महाविकास आघाडीत भांडणं, प्रकाश आंबेडकरांचा दावा, उद्या महत्वाची बैठक