मुंबई : येत्या काही आठवड्यात लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागणार आहे. याची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. परंतु राज्यात अजूनही महायुतीत जागावाटप झालेले नाहीय. यातच भाजपकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी २३ जागांवर निरिक्षक नेमले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने एकूण २२ जागांची मागणी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गट दहा ते १३ जागांसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी एकूण १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे. मात्र यात महाराष्ट्राचा समावेश नाहीत. अशातच आता महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.
हेही वाचा…लोकसभेच्या ‘या’ १७ जागांवर अजित पवार आग्रही, महायुतीत किती अन् कोणत्या जागा मिळणार ?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून उत्तर मुंबईतून विनोद तावडे किंवा पियुष गोयल, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक, उत्तर मध्य मुंबईतून पुनम महाजन, बीडमधून पंकजा मुंडे, साताऱ्यातून उदयनराजे, चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून मंत्री सुधीर मुनगंटीवार किंवा अशोक जीवतोडे यांच्या नावाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधून भागवत कराड किंवा अतुल सावे, पुण्यातून मुरलीधर मोहळ, धुळे, प्रतापराव दिघावकर, नांदेड प्रताप पाटील चिखलीकर, जालना रावसाहेब दानवे, अकोला संजय धोत्रे, नागपूर नितीन गडकरी, नंदुरबार विजयकुमार गावित किंवा हिना गावित, पालघर राजेंद्र गावित यांच्या नावाची चर्चा आहे.
रावेर रक्षा खडसे, किंवा केतकी पाटील, शिर्डी रामदास आठवले, सोलापुर अमर साबळे, भंडारा-गोंदिया सुनील मेंढे, गडचिरोली चिमूर, अशोक नेते, भिवंडी कपिल पाटील, संजयकाका पाटील सांगली, दिंडोरी डॉ. भारती पवार, धाराशिव बसवराज पाटील किंवा बसवराज मंगरूळे यांच्या नावांची चर्चा आहे. अमरावतीतून भाजप नवनीत राणा यांना तिकीट देण्याची शक्यता आहे. अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, वर्धा लोकसभा मतदारसंघातून रामदास तडस यांचीही चर्चा आहे.
हेही वाचा…जागावाटपावरून महाविकास आघाडीत भांडणं, प्रकाश आंबेडकरांचा दावा, उद्या महत्वाची बैठक
तर शिंदेंच्या शिवसेनेकडून काही संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यामध्ये दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे, मावळ श्रीरंग बारणे, वाशिम-यवतमाळ संजय राठोड, नाशिक हेमंत गोडसे, बुलढाणा प्रतापराव जाधव, हातकणंगले धैर्यशील माने, हिंगोली हेमंत पाटील, रामटेक कृपाल तुमाने यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु काही लोकसभेच्या जागा अशा आहेत की त्यावरून वाद सुरू आहे. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून भाजपकडून नारायण राणे तर शिंदेंकडून किरण सामंत. माढा लोकसभेतून भाजपकडून रणजीत निंबाळकर, तर राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, रायगडमधून अजित पवारांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे किंवा भाजपचे धैर्यशील पाटील, तर बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे.
READ ALSO :
हेही वाचा…येत्या १४ मार्च रोजी लोकसभा निवडणुकांची होणार घोषणा, एकूण सात टप्प्यात होणार मतदान
हेही वाचा…महाविकास आघाडीकडून वंचितला ४ ते ५ जागा, उद्या महत्वाची बैठक
हेही वाचा“शिंदे गटाच्याच खासदार अन् मंत्र्यांत मोठा वाद,” भावना गवळीच्या समर्थकांची राठोड विरोधात पोस्टरबाजी
हेही वाचा…नितीन गडकरींच्या पाठीत वार करण्याचे भाजपचे षडयंत्र , गडकरींना भाजपच्या पहिल्या यादीतून वगळले
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक झाली की अनेक आमदार शरद पवारांकडे येतील”, रोहित पवारांचा मोठा दावा