मुंबई : उद्या मुंबईत महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत महत्वाची बैठक होत आहे. महाविकास आघाडीने वंचितला देखील जागावाटपाच्या बैठकीचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून सुरू असलेला जागावाटपाचा तिढा आता सुटणार अशी चर्चा सुरू आहे. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २३ जागांचा प्रस्ताव घेऊन सिल्वहर ओकवर शरद पवारांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.
हेही वाचा…“शिंदे गटाच्याच खासदार अन् मंत्र्यांत मोठा वाद,” भावना गवळीच्या समर्थकांची राठोड विरोधात पोस्टरबाजी
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने २३ जागा लढविल्या होत्या. त्यातील १८ जागांवर दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे या सर्व जागा आम्हाला देण्यात याव्यात अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. या जागांचा प्रस्ताव घेऊन ठाकरे पवारांच्या भेटीला गेले आहेत. यामध्ये जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे , कोल्हापुर, बुलढाणा, हातकणंगले, शिर्डी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी , रत्नागिरी-सिंधुदूर्ग, यवतमाळ-वाशिम, मावळ, रायगड, रामटेक., दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, कल्याण-डोंबिवली या जागांचा समावेश आहे.
हेही वाचा…नितीन गडकरींच्या पाठीत वार करण्याचे भाजपचे षडयंत्र , गडकरींना भाजपच्या पहिल्या यादीतून वगळले
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठक सुरू आहेत. मात्र जागावाटपाचा तिढा असूनही सुटलेला नाही. अशातच आता महाविकास आघाडीसोबत वंचितही आल्याने यात आणखी गुंता निर्माण झाला आहे. यातच वंचितसोबत शरद पवार आणि कॉंग्रेस चर्चा करीत आहेत. तर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी वंचितला चार ते पाच जागा देण्यात महाविकास आघाडी तयार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता वंचितच्या कोट्याला किती जागा येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..नवनीत राणांची महायुतीकडून उमेदवारी निश्चित, आनंद अडसुळांना राणांचा प्रचार करावा लागणार
हेही वाचा…नांदेडचं राजकीय वारं फिरलं, चिखलीकरांचा पत्ता कट होणार, अशोक चव्हाण नवा उमेदवार मैदानात उतरवणार
हेही वाचा…महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, भाजप २३ तर शिंदेंच्या शिवसेनेला २२ जागा ?
हेही वाचा…येत्या १४ मार्च रोजी लोकसभा निवडणुकांची होणार घोषणा, एकूण सात टप्प्यात होणार मतदान
हेही वाचा…महाविकास आघाडीकडून वंचितला ४ ते ५ जागा, उद्या महत्वाची बैठक