जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. यातच जळगाव येथे अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. या पहिल्याच सभेत अमित शाह यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. अमित शाह यांनी पवार आणि ठाकरेंच्या घराणेशाहीवरून जोरदार टिका केली आहे. तसेच देशाच्या भविष्यासाठी विकासासाठी मोदींना पतंप्रधान करा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा…येत्या १४ मार्च रोजी लोकसभा निवडणुकांची होणार घोषणा, एकूण सात टप्प्यात होणार मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील १० वर्षाच्या कामाचा हिशोब विरोधकांकडून मागितला जातो आहे. परंतु मी शरद पवारांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षापासून तुमचा भार वाहत आहे. तुम्ही त्या ५० वर्षाचा सोडा पण सध्या पाच वर्षाचा तरी हिशोब जनतेला द्या. मग मोदींच्या १०९ वर्षांचा हिशोबा मागा असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…महाविकास आघाडीकडून वंचितला ४ ते ५ जागा, उद्या महत्वाची बैठक
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ज्या पक्षांमध्ये लोकशाही नाही ते घराणेशाही असणारे पक्ष आहेत. असे पक्ष देशात लोकशाही ठेवतील का असा सवालही त्यांनी केला. सोनिया गांधी राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे. शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जींना आपल्या भाच्याला मुख्यमंत्री करायचे आहे, स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे. मग सगळ्यांपैकी तुमच्यासाठी कोण आहे ? तुमच्यासाठी कोणी असेल तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. असेही त्यांनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत मराठा समाज देणार ५०० उमेदवार, मराठा समाज देणार मोठा दणका
हेही वाचा…२३ जागांचा प्रस्ताव घेऊन ठाकरे पवारांच्या भेटीला, मुंबईत जागावाटपांबाबत खलबत्तं
हेही वाचा..नवनीत राणांची महायुतीकडून उमेदवारी निश्चित, आनंद अडसुळांना राणांचा प्रचार करावा लागणार
हेही वाचा…नांदेडचं राजकीय वारं फिरलं, चिखलीकरांचा पत्ता कट होणार, अशोक चव्हाण नवा उमेदवार मैदानात उतरवणार
हेही वाचा…महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, भाजप २३ तर शिंदेंच्या शिवसेनेला २२ जागा ?