पुणे : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडली. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांनी शरद पवारांची भक्कम साथ दिली. यातच आता बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचाराला मैदानात देखील उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यातच आता आज बारामतीची ओळख शरद पवारांमुळेच असल्याचे वक्तव्य युगेंद्र पवार यांनी केले आहे.
हेही वाचा…महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर होणार शिक्कामोर्तब, आंबेडकरही बैठकीला उपस्थित राहणार
युगेंद्र पवार म्हणाले की, आज बारामतीची ओळख शरद पवारांमुळेच आहे. मी राजकारणात नाही, विद्या प्रतिष्ठानची जबाबदारी माझ्यावर असून त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रातही काम करत आहे. आपण साहेबांसाठी काहीतरी केलं पाहिजे असे मला वाटतं आहे. आज त्यांना सपोर्टची सगळ्यात जास्त गरज आहे. त्यामुळे आमपण सगळ्यांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला पाहिजे. यातच आपण भारताच्या कुठल्याही कानोकोपऱ्यात गेलो तरी बारामती हे नाव सांगितल्यानंतर शरद पवारांचे गाव अशी ओळख निर्माण झालीय. त्याच्यामुळे आता सगळ्यात जास्त साहेबांना सपोर्ट देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“हा कावा महाराष्ट्रात चालणार नाही, वाऱ्या तुमच्या, पण वारे आमचेच”, ठाकरेंच्या शिलेदारांने थेट शाहांनाच दिले चॅलेंज
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. आतापर्यंत ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार असून बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, फॉर्म्युलाही ठरला
हेही वाचा…“तर अजित पवार अन् शिंदेंच्या उमेदवारांना कमळावर निवडणुक लढवावी लागेल”, महायुतीत मोठी खलबतं
२२-१८-०९ महाविकास आघाडीचा फॉर्म्युला, मुंबईत आज महत्वाची बैठक
हेही वाचा…“ठाकरेंना मोदींसोबत यावचं लागणार, अंदाज चुकणार नाय”, शिंदें गटातल्या आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“आता संसदेतूनच आवाज उठवणार!” वडेट्टीवारांची कन्या लोकसभेसाठी इच्छूक