सातारा : आगामी काही महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलली आहेत. यातच आता माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गट राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उतरविणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु यावर भाजपने उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महादेव जानकर कोणता निर्णय घेणार ? अशी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“ठाकरेंना मोदींसोबत यावचं लागणार, अंदाज चुकणार नाय”, शिंदें गटातल्या आमदाराचा मोठा दावा
महादेव जानकर यांना शरद पवार यांनी माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवल्यानंतर आता ठाकरे गट आणि कॉंग्रेसला कोणती जागा सोडणार ? याचीही चर्चा आहे. यातच महादेव जानकरांसाठी शरद पवार आग्रही असतानाचा शरद पवार गटाकडूनच अभयसिंह जगताप हे सुद्धा माढा लोकसभेसाठी इच्छूक आहेत. जगताप यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याने माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छूक असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा…“आता संसदेतूनच आवाज उठवणार!” वडेट्टीवारांची कन्या लोकसभेसाठी इच्छूक
काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीचे सुतोवाच केले होते. जगताप सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवडचे असून पेशाने व्यावसायिक असून गेल्या काही वर्षापासून ते शरद पवारांच्या गटामध्ये सक्रीय झाले आहेत. यातच माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मी फिरलो असून याची माहिती शरद पवारांना दिली आहे. पदाधिकारी सोबत असून आम्ही चर्चा केली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय शरद पवार घेतील असे त्यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कोल्हापुरची जागा शाहू महाराज लढवणार, स्वराज्य पक्षाने घेतली मोठी भूमिका
हेही वाचा…“शरद पवारांना आता सपोर्ट करण्याची गरज”, अजित पवारांच्या पुतण्याचं वक्तव्य
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, फॉर्म्युलाही ठरला
हेही वाचा…“तर अजित पवार अन् शिंदेंच्या उमेदवारांना कमळावर निवडणुक लढवावी लागेल”, महायुतीत मोठी खलबतं
२२-१८-०९ महाविकास आघाडीचा फॉर्म्युला, मुंबईत आज महत्वाची बैठक