धुळे : राज्यात भाजपने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिशन ४५ असा संकल्प ठेवला आहे. या संकल्पावरून जे उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यांनाच पुन्हा २०२४ च्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येणार आहे. यामुळे भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे. यातच धुळे लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची वाट यावरून बिकट झाली आहे. याठिकाणी भाजप भामरे यांना धक्कातंत्र देत नवीन उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…“ठाकरेंना मोदींसोबत यावचं लागणार, अंदाज चुकणार नाय”, शिंदें गटातल्या आमदाराचा मोठा दावा
तिसऱ्यांदा उमेदवारी मिळावी, यासाठी डॉ. सुभाष भामरे जोरदार प्रयत्न करीत आहेत. मात्र याठिकाणी भाजप धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची चर्चा आहे. यातच भामरे यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी लपून राहिलेली नाहीय. त्यामुळे याठिकाणी डझनभर इच्छुकांनी निवडणुक लढण्याचे सुतोवाच केले आहे. अशातच अलिकडेच माजी आयपीएस अधिकारी प्रतापराव दिघावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांची धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपमधील एका गटाने आधीपासूनच सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला विरोध सुरू केलाय. मात्र भामरे उमेदवारीविषयी निश्चित असल्याचे सांगत आहेत. यातच भाजपमध्ये आल्याने दिघावकरांच्या रूपाने यावेळी नाशिक जिल्ह्याला संधी देण्यात यावी, असा आग्रह आता समर्थकांकडून करण्यात येत आहे. दिघावकर हे बागलाण येथील रहिवासी असून हिंदुत्वावादी आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.
हेही वाचा…“आता संसदेतूनच आवाज उठवणार!” वडेट्टीवारांची कन्या लोकसभेसाठी इच्छूक
धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभांचा समावेश आहे. तर धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा यांचा समावेश आहे. याठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघावर भाजपचे वचर्स्व राहिलंय. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुभाष भामरे यांनी विजयाची पताका फडकावली होती. तर १९९१ ते १९९६ या काळात कॉंग्रेसचे बापु हरी चौरे विजयी झाले होते. मात्र त्यानंतर भाजपनेच याठिकाणी बाजी मारली आहे. त्यामुळे भाजप आता धुळे लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळ फुलवणार का ? याची उत्सुकता लागून राहिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…माढा लोकसभेतून जानकरांना उमेदवारी, शरद पवारांच्या ‘या’ शिलेदारानेही थंड थोपटले
हेही वाचा…“शरद पवारांना आता सपोर्ट करण्याची गरज”, अजित पवारांच्या पुतण्याचं वक्तव्य
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, फॉर्म्युलाही ठरला
हेही वाचा…“तर अजित पवार अन् शिंदेंच्या उमेदवारांना कमळावर निवडणुक लढवावी लागेल”, महायुतीत मोठी खलबतं
२२-१८-०९ महाविकास आघाडीचा फॉर्म्युला, मुंबईत आज महत्वाची बैठक