मुंबई : मुंबईतील साकीनाका येथे क्रांती नगर, बैल बाजार येथील झोपडपट्टी धारकांसाठी सदनिकांचे चावी वाटप करण्यात आले. परंतु यामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: च्या हाताने चावी वाटप होत असताना हा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या घोटाळ्याची आता एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
हेही वाचा…“तर अजित पवार अन् शिंदेंच्या उमेदवारांना कमळावर निवडणुक लढवावी लागेल”, महायुतीत मोठी खलबतं
साकीनाका येथे क्रांती नगर बैल बाजार येथील झोपडपट्टी धारकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे चावी वाटप करण्यात आले. या चावी वाटपात मोठा घोटाळा झालाय. हे चावी वाटप करताना बोगस नावे घुसविण्यात आली आहेत. त्यानंतर लगेच या सदनिकांची खरेदी केली गेली. यातील काही लोक युपी मधील आहेत. या प्रकरणात १० कोटीच्या ५३ सदनिका संदर्भात बनावट कागदपत्रे बनवली गेली आहेत. असे म्हणत हे हिमनगाचे टोक असून शेकडो कोटींचा यामध्ये घोटाळा झाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
अश्विनी भिडे, वेलारासू हे वरिष्ठ सनदी अधिकारी देखील याच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे हे आएएसएस नसतानाही मोठ्या पदावर आहेत. हे अधिकार मर्जीतील असल्याने ते पक्षपातीपणा करू शकतात. हे अधिकारी निधी वाटपात दुजाभाव करू शकतात. निवडणुकी दरम्यान प्रभाव पाडून शकतात असेही त्यांनी सांगितलेय.
हेही वाचा…२२-१८-०९ महाविकास आघाडीचा फॉर्म्युला, मुंबईत आज महत्वाची बैठक
दरम्यान, सदनिका घोटाळ्यात मुख्यमंत्र्याचा वरदहस्त आहे का? मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी दबाव आणला आहे का? मुख्यमंत्र्यांचा कोणी हात धरला आहे का? असाही सवाल त्यांनी केलाय. निवडणूक आयोगाने सांगून देखील या अधिकाऱ्यांच्या बदल्या का होत नाहीत. मुख्यमंत्र्यांवर या अधिकाऱ्यांनी दबाव आणला आहे का? मुख्यमंत्र्यांचा कोणी हात धरला आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यामुळे सरकारने या अधिकाऱ्यांच्या वेळीच बदल्या केल्या पाहिजेत तरच मुंबईतील निवडणुका फ्री अँण्ड फेअर वातावरणात पार पडतील . सरकार या अधिकाऱ्यांच्या बदल्या करत नसल्याने आता आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाल पत्र पाठविले आहे. असेही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“जितक्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला, तितक्याच राष्ट्रवादीला ,” भुजबळांनी स्पष्टच सांगितले
भामरेंचा पत्ता कट, प्रतापराव दिघावकर भाजपचे नवे उमेदवार, धुळ्यात कमळ फुलणार का ?
हेही वाचा…माढा लोकसभेतून जानकरांना उमेदवारी, शरद पवारांच्या ‘या’ शिलेदारानेही थंड थोपटले
हेही वाचा…“शरद पवारांना आता सपोर्ट करण्याची गरज”, अजित पवारांच्या पुतण्याचं वक्तव्य
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, फॉर्म्युलाही ठरला