नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात एव्हाना देशात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच आज मुंबईत महायुतीची जागावाटपाबाबत महत्वाची बैठक पार पडली. भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी अजित पवारांसह शिंदेंच्या शिवसेनेसोबत यावेळी चर्चा केली. यानंतर भाजपचे महत्वाचे नेते तात्काळ दिल्लीला रवाना झाले आहेत. नवी दिल्लीत या नेत्यांची एकत्रित बैठक राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थित पार पडणार आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना आता सपोर्ट करण्याची गरज”, अजित पवारांच्या पुतण्याचं वक्तव्य
जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्र लोकसभा निवडणुक संदर्भात कोअर कमिटीची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी महाराष्टरातून देवेंद्र फडणवीस यांच्यासह, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार दिल्लीत दाखल झाले आहेत. आज सायंकाळी जे.पी.नड्डा, यांच्यासह अमित शाह आणि बी.एल. संतोष यांच्यासोबत चर्चा होणार आहे.
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, फॉर्म्युलाही ठरला
रात्री आठ वाजता यासंदर्भात बैठक होणार आहे. परंतु त्याआधी रावसाहेब दानवे यांच्या घरी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीत आता काय निर्णय घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याआधी भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याचा समावेश नाही. त्यामुळे आता लवकरच याबाबत घोषणा होण्याचीही शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुक न लढवण्याचे संभाजीराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले “मी लोकसभेसाठी १०० टक्के योगदान दिलं असतं..पण…”
हेही वाचा…“सदनिका घोटाळ्यात मुख्यमंत्र्याचा वरदहस्त आहे का?” 10 कोटीचा घोटाळा, वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
हेही वाचा…“जितक्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला, तितक्याच राष्ट्रवादीला ,” भुजबळांनी स्पष्टच सांगितले
भामरेंचा पत्ता कट, प्रतापराव दिघावकर भाजपचे नवे उमेदवार, धुळ्यात कमळ फुलणार का ?
हेही वाचा…माढा लोकसभेतून जानकरांना उमेदवारी, शरद पवारांच्या ‘या’ शिलेदारानेही थंड थोपटले