मुंबई : राज्यात सध्या निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. यातच राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर दोन्ही गट आता एकमेकांवर टिका टिप्पणी करतांना दिसत आहेत. यातच अरूणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारांची भेट घेतल्याचे ट्विट केलं. परंतु त्यावर राष्ट्रवादीचे एकही आमदार अरूणाचल प्रदेशमध्ये नसल्याचे शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं. ही चुक लक्षात येताच अजित पवारांनी आपले ट्विट डिलीट केल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा…निवडणुक न लढवण्याचे संभाजीराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले “मी लोकसभेसाठी १०० टक्के योगदान दिलं असतं..पण…”
अजित पवारांनी काल यासंदर्भात एक ट्विट केलं होतं. त्यात काही अजित पवारांसह काही नेत्यांचा फोटो शेअर केला. त्यात अरूणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार आणि पदाधिकारी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचं मनापासून स्वागत केलं. या भेटीदरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा पार पडली. असे सांगण्यात आलं. परंतु अरूणाचलप्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे आमदारच नाही असं म्हणत शरद पवार गटाने अजित पवार गटाला डिवचलं.
शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटलंय की, काय….? अरुणाचलप्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे आमदार…? अहो, अरुणाचलप्रदेशमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहभागच घेण्यात आला नव्हता. मग आमदार झाले तरी कधी ? हा आता… अदृश्य शक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार अरुणाचल प्रदेशच्या यादीत दाखवले असतील, तर ती वेगळी गोष्ट…अरुणाचलप्रदेश आणि नागालँडमध्ये तितकाच फरक आहे जितका महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहे, हे समजणं अत्यावश्यक आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…“सदनिका घोटाळ्यात मुख्यमंत्र्याचा वरदहस्त आहे का?” 10 कोटीचा घोटाळा, वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
दरम्यान, आता घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आल्यानंतर हा राज्या राज्यातील फरकांचा गोंधळ उडणारच म्हणा…! त्यामुळे ज्या भाजपसोबत आपण गेलात त्यांच्या, खोटं बोल पण रेटून बोल या परंपरेचा वाण नाही पण गुण लागला हे दुर्दैव ! आपला रोखठोक बाणा अजूनही शाबूत असेल तर, चूक स्वीकारा पण भाजपप्रमाणे ट्विट डिलीट करू नका. असेही त्यांनी सांगितले. परंतु त्याआधीच अजित पवार गटाने ते ट्विट डिलीट केले आहे.
काय….? अरुणाचलप्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे आमदार…? अहो, अरुणाचलप्रदेशमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहभागच घेण्यात आला नव्हता… मग आमदार झाले तरी कधी ? हा आता… अदृश्य शक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार अरुणाचलप्रदेशच्या यादीत दाखवले… https://t.co/NAjfPq6Tew
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 7, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“जंयत पाटलांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ येऊ देऊ नका,” अजित दादांच्या आमदाराने रोहित पवारांना फटकारलं
हेही वाचा…कमळावर की धनुष्यबाणावर निवडणुक लढणार ? श्रीरंग बारणेंनी स्पष्ट सांगितले
हेही वाचा…“अजितदादांचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणुक लढतील,” बच्चू कडू यांचा मोठा दावा
आढळराव राष्ट्रवादीत तर बारणे भाजपमधून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या सेनेत आणखी पेच वाढला
हेही वाचा…दिल्लीत खलबतं, महाराष्ट्राचे नेते दिल्लीत दाखल, जागावाटपाचा तिढा सुटणार