पुणे : एका बाजूला लोकसभा जागावाटपाची चर्चा होत असतांना दुसऱ्या बाजूला शिंदेंना धक्क्यावर धक्के बसण्यास सुरूवात झालीय. शिरूर मतदारसंघातून लोकसभा लढवण्यासाठी आढळराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली. यातच आता पुण्यातले माथाडी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष निलेश माझिरे यांनी देखील पदाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली.
हेही वाचा…माढा लोकसभेतून जानकरांना उमेदवारी, शरद पवारांच्या ‘या’ शिलेदारानेही थंड थोपटले
आपल्याला बैठकीला प्रवेश दिला नाही. सोबत बरेच वेळ थांबवून ठेवलं. म्हणून आपण राजीनामा देत असल्याची माहीत निलेश माझिरे यांनी दिलीय. पुण्यातल्या लोकसभफेच्या तीन मतदारसंघांबाबत दोन दिवसांपुर्वी महायुतीची महत्वाची बैठक पार पडली.
हेही वाचा…“शरद पवारांना आता सपोर्ट करण्याची गरज”, अजित पवारांच्या पुतण्याचं वक्तव्य
याच बैठकीसाठी रासप वगळता सर्व घटकपक्षांना निमंत्रण होतं. त्यामुळे मोठं नाराजीनाट्य त्या दिवशी सुरू होतं. त्यासोबत महादेव जानकर हे महायुतीला रामराम करून महाविकास आघाडीचा भाग होणार असल्याचीही चर्चाही जोर धरू लागलीय. त्यामुळे महायुतीत सध्या आलबेल नसल्याचं दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…दिल्लीत खलबतं, महाराष्ट्राचे नेते दिल्लीत दाखल, जागावाटपाचा तिढा सुटणार
हेही वाचा…निवडणुक न लढवण्याचे संभाजीराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले “मी लोकसभेसाठी १०० टक्के योगदान दिलं असतं..पण…”
हेही वाचा…“सदनिका घोटाळ्यात मुख्यमंत्र्याचा वरदहस्त आहे का?” 10 कोटीचा घोटाळा, वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
हेही वाचा…“जितक्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला, तितक्याच राष्ट्रवादीला ,” भुजबळांनी स्पष्टच सांगितले
भामरेंचा पत्ता कट, प्रतापराव दिघावकर भाजपचे नवे उमेदवार, धुळ्यात कमळ फुलणार का ?