मावळ : आगामी लोकसभा निवडणुकीकरीता महायुतीत सध्या जागावाटपाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात मुंबई आणि दिल्लीत महत्वाच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. यातच मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पुन्हा एकदा मीच उमेदवार असणार, असा मोठा दावा सांगितला आहे. तर याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न सूरू झाले आहेत.
हेही वाचा…“जितक्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला, तितक्याच राष्ट्रवादीला ,” भुजबळांनी स्पष्टच सांगितले
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार हा श्रीरंग बारणे असणार. यातच उद्धव ठाकरे गटातील इच्छूक उमेदवार संजोग वाघेरे यांनी गद्दारांना आम्ही पाडणारच असं म्हटलं होतं. त्यावर विचारले असता. बारणे म्हणाले की, ते कोणत्या पक्षातून गद्दारी करून आले आहे. त्यांना आधी विचारा. असं म्हणत वाघेरे यांची बारणेंनी इजतच काढली. महायुतीचे उमेदवार तुम्ही आहेत, परंतु अशी परिस्थिती आली की तुम्हाला कमळाच्या चिन्हावर निवडणुक लढावी लागली तर तुम्ही लढणार का ? यावर बारणे म्हणाले की, त्यासंदर्भात कोणतंही वक्तव्य करणे उचित ठरणार नाही. महायुतीचा श्रीरंग बारणे हाच असणार असेही त्यांनी म्हटले. तसेच मी धनुष्यबाणावर निवडणुक लढविणार असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…भामरेंचा पत्ता कट, प्रतापराव दिघावकर भाजपचे नवे उमेदवार, धुळ्यात कमळ फुलणार का ?
दरम्यान, राष्ट्रवादीतून ठाकरे गटात आलेल्या संजोग वाघेरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. अलिकडेच मावळात ठाकरेंनी जाहीर सभा घेत वाघेरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मावळात श्रीरंग बारणे विरूद्ध संजोग वाघेरे अशी लढत आता स्पष्ट झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजितदादांचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणुक लढतील,” बच्चू कडू यांचा मोठा दावा
आढळराव राष्ट्रवादीत तर बारणे भाजपमधून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या सेनेत आणखी पेच वाढला
हेही वाचा…दिल्लीत खलबतं, महाराष्ट्राचे नेते दिल्लीत दाखल, जागावाटपाचा तिढा सुटणार
हेही वाचा…निवडणुक न लढवण्याचे संभाजीराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले “मी लोकसभेसाठी १०० टक्के योगदान दिलं असतं..पण…”
हेही वाचा…“सदनिका घोटाळ्यात मुख्यमंत्र्याचा वरदहस्त आहे का?” 10 कोटीचा घोटाळा, वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल