मुंबई : काही आमदार लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी तर काही नंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येतील, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यावर आता अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवारांनी आधी स्वत: च्या मतदारसंघात चांगलं काम करावं. अन् त्यानंतरच राज्याचा नेता होण्याचं स्वप्न पाहवं. असा टोलाही शेळके यांनी रोहित पवारांना लगावला आहे.
हेही वाचा…“सदनिका घोटाळ्यात मुख्यमंत्र्याचा वरदहस्त आहे का?” 10 कोटीचा घोटाळा, वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
महाराष्ट्रातील स्वंयघोषित नेते रोहित पवार यांनी ज्योतिषाचा धंदा कधी पासून सुरू केला आहे? मागील दोन दिवसापुर्वी अजितदादांसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदार इतर पक्षात जाऊ शकतात. असे त्यांनी सांगितलं होतं. तुम्ही ज्या २२ आमदारांचा उल्लेख करीत आहात. त्यातील किमान २ आमदारांची नावं देखील सांगावीत. असं आवाहनच सुनील शेळके यांनी दिलं आहे.
हेही वाचा…“जितक्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला, तितक्याच राष्ट्रवादीला ,” भुजबळांनी स्पष्टच सांगितले
अगोदर तुमच्या मतदारसंघातील मायबाप जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकचा वेळ द्यावा. त्यानंतर राज्याचे नेते होण्याचं स्वप्न पाहवं. जयंत पाटील यांच्यासारखं नेतृत्व आपल्यासोबत असतांना त्यांची देखील तुम्हाला अडचण होते. काही दिवसानंतर राष्ट्रवादी जयंत पाटील यांनी देखील पक्ष सोडावा, अशी रणनिती आखताहेत. ती थांबून जंयत पाटील सारख्या नेत्यांना पक्षात कसं थांबावता येईल. त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देण्याची वेळ येऊ देऊ नका. यासाठीही प्रयत्न करावेत. असा सल्लाही त्यांनी दिला.
READ ALSO :
हेही वाचा…कमळावर की धनुष्यबाणावर निवडणुक लढणार ? श्रीरंग बारणेंनी स्पष्ट सांगितले
हेही वाचा…“अजितदादांचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणुक लढतील,” बच्चू कडू यांचा मोठा दावा
आढळराव राष्ट्रवादीत तर बारणे भाजपमधून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या सेनेत आणखी पेच वाढला
हेही वाचा…दिल्लीत खलबतं, महाराष्ट्राचे नेते दिल्लीत दाखल, जागावाटपाचा तिढा सुटणार
हेही वाचा…निवडणुक न लढवण्याचे संभाजीराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले “मी लोकसभेसाठी १०० टक्के योगदान दिलं असतं..पण…”