लोणावळा : अजित पवार गटातील तब्बल १३७ पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानिमित्ताने लोणावळा याठिकाणी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून आमदार सुनील शेळके यांनी दमदाटी केल्याची माहिती समोर आलीय. त्यावरून भर कार्यक्रमातून शरद पवारांनी सुनील शेळके यांना कडक इशारा दिला. त्यावर आता सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी केलेले आरोप फेटाळून लावले.
हेही वाचा…कमळावर की धनुष्यबाणावर निवडणुक लढणार ? श्रीरंग बारणेंनी स्पष्ट सांगितले
मी मागील काही दिवसापासून कुणाशी संपर्क केला. कुणासोबत दमदाटी केली. त्याची चौकशी करा. नाहीतर साहेबांना ज्यांनी कुणी माहिती दिली. त्यांनी माझ्यावर आरोप सिद्ध करावे, अन्यथा मावळ मध्ये येऊन साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले असे संपुर्ण महाराष्ट्रात सांगेन. असे सुनील शेळके यांनी सांगितले आहे. यासंदर्भात शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना कुणी माहिती दिली आहे. याबाबत विचारण करणार. तसेच आपण माझ्यावर जे काही आरोप केलेत. त्यात काही तथ्य आहे. त्याबाबत त्यांना विचारणार. असे सुनील शेळके यांनी सांगितले आहे.
आमदाराच्या गटबाजीमुळे मावळातील १३७ पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात दाखल झाले. यावर बोलतांना सुनील शेळके म्हणाले की, शरद पवारांसोबत गेलेल्या एकाही व्यक्तीने अजितदादांसोबत असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही. ज्यावेळी निवडणुक आयोगाने आपल्यासोबत असलेल्या व्यक्तींचे प्रतिज्ञापत्र करून देण्यास सांगितले. त्यावेळी त्यातील शरद पवारांसोबत गेलेल्या एकाही व्यक्तींनी भरून दिलेलं नाही. मावळ तालुक्यातील मावळ तालुक्यातील जनतेला दहशतवादी, झुंडशाही चालत नाही, त्यांना विकासकामांना प्राधान्य देणारा आहे. आज मावळ तालुक्यातील जनतेने शरद पवारांना दाखवून दिलं की आज आम्ही अजितदादांसोबत आहोत. असेही शेळके म्हणाले.
हेही वाचा…“अजितदादांचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणुक लढतील,” बच्चू कडू यांचा मोठा दावा
दरम्यान, काही लोकांनी आजच्या कार्यक्रमाला येऊ नये म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली आहे. लोकशाही देशात एकमेकांवर टिका केलीच जातेच. परंतु टिका केली म्हणून कार्यकर्त्यांना दमदाटी केली जातेय. त्यामुळे तु आमदार कुणामुळे झाला ? तुझ्या सभेला कोण आला होता ? जेव्हा निवडणुक झाली.त्यावेळी त्या अर्जावर सही माझी आहे. माझ्या सहीमुळेच तु आमदार झालाय. आणि आज ज्या पक्षातील कार्यकर्त्यांनी जीवतोडून पक्षाचं काम केलं आहे. आज त्यांनाच तुम्ही दमदाटी करत आहात. एकदा तुम्ही असं केलं आहे. परंतु पुन्हा केलं तर लक्षात ठेवा माझं नाव शरद पवार आहे. असा इशारा शरद पवारांनी दिला.
READ ALSO :
हेही वाचा…“..लक्षात ठेवा मलाही शरद पवार म्हणतात,” शरद पवारांनी शेळकेंना दिला इशारा
हेही वाचा…“तर फडणवीसांना गुजरातमध्ये जाऊन स्वत : चा प्रचार करावा,” शरद पवार गटाने फडणवीसांना डिवचलं
पुण्यात लोकसभेसाठी भाजपात स्पर्धा वाढली, मोहोळांविरोधात ‘तो’ बॅनर नेमका कोणी लावला ?
हेही वाचा…“अजित पवार गटाचा उडाला गोंधळ,” शरद पवारांनी डिचवल्याने अजित पवार गटाला ‘ते’ ट्विट करावा लागलं डिलीट
हेही वाचा…“जंयत पाटलांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ येऊ देऊ नका,” अजित दादांच्या आमदाराने रोहित पवारांना फटकारलं