लातूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या लातुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यातच लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली. यावेळी अमित शाह हे शेपुट घालणारे गृहमंत्री आहेत. हिमंत असेल तर अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपुरला जावं असं आव्हानच ठाकरेंनी यावेळी दिलं.
हेही वाचा…“अजित पवार गटाचा उडाला गोंधळ,” शरद पवारांनी डिचवल्याने अजित पवार गटाला ‘ते’ ट्विट करावा लागलं डिलीट
अमित शाह यांनी महाराष्ट्रात येऊन आमच्यावर टिका केली. अमित शाह शेपुट घालून महाराष्ट्रात येत आहेत. परंतु तिकडे मणिपुर पेटलं असता त्यांची त्याठिकाणी जायची हिमंत नाही. असा हा शेपुट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला. माझ्यावर काय बोलले त्यांचा मी नंतरच्या सभेत समाचार घेईनच. परंतु त्यांची या राज्यांमध्ये जायची हिमंत होत नाही, असा हल्लाबोल ठाकरेंनी चढवला.
हेही वाचा…“जंयत पाटलांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ येऊ देऊ नका,” अजित दादांच्या आमदाराने रोहित पवारांना फटकारलं
पुढे बोलातांना ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालूच शकत नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेना फोडली. बाळासाहेबांचे फोटो लावत आहेत. मी मिंध्यांना भाजपलाही आव्हान देतोो. स्वत: च्या वडिलांचे फोटो लावून जिंका ना ? स्वत:च्या वडिलांवर आत्मविश्वास नाही का ? माझे वडिल का चोरता ? असा सवालही त्यांनी केलाय.
संपुर्ण महाराष्ट्र आता चवताळलेला आहे, तो आता वाट बघतोय निवडणुका व्हायची. आता भाजपला संपवून गाडून, मुठमाती देऊन शिवसेना पुढे जाईल. पण शिवसेना संपणार नाही. ट्रिपल इंजिनच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लावलेली आहेत. असे म्हणत मोदीजींनी मेरा परिवार म्हटलंय. पण त्या परिवाराची जबाबदारी कोण घेणार ? असासही सवाल केला.
READ ALSO :
हेही वाचा“मुंबई पालिका भ्रष्टाचाराचे आगार, 700 कोटींच्या कंत्राटावर डल्ला”, विरोधकांचा हल्लाबोल
हेही वाचा…“नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात सांगेन की शरद पवारांनी माझ्यावर..,” सुनील शेळकेंचं पवारांना प्रत्युत्तर
हेही वाचा…“..लक्षात ठेवा मलाही शरद पवार म्हणतात,” शरद पवारांनी शेळकेंना दिला इशारा
हेही वाचा…“तर फडणवीसांना गुजरातमध्ये जाऊन स्वत : चा प्रचार करावा,” शरद पवार गटाने फडणवीसांना डिवचलं
पुण्यात लोकसभेसाठी भाजपात स्पर्धा वाढली, मोहोळांविरोधात ‘तो’ बॅनर नेमका कोणी लावला ?