पुणे : आज प्रत्येक कुटुंबात घुसमटलेला स्वप्निल आहे. त्यामुळे सरकारने एमपीएससीच्या उमेदवारांच्या नियुक्ता करेपर्यंत आणखी निष्पाप स्वप्निलचे बळी घेऊ नयेत. सरकारने तातडीने आयोगाचे सदस्य नियुक्त करुन एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या दिल्या पाहिजेत अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
महाराष्ट्रावरचं मोठं संकट टळलं, मात्र… राज्य सरकारचा मोठा निर्णय!
एमपीएससीच्या गोंधळाला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचललेल्या पुणे येथील विद्यार्थी स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबियांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. प्रविण दरेकर आज पुणे मधील फुरसुंगी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन त्यांना धीर दिला. लोणकर कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असून त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दरेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिले.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांच्या मुख्य परिक्षा झाल्या आहेत व जे मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात. त्यामुळे स्वप्निल सारख्या अन्य विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने सरकारने तातडीने पावले उचलावित, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read Also :
- शरद पवार ‘पंतप्रधान’ पदासाठी योग्य की ‘राष्ट्रपती’ पदासाठी? शिवसेनेने मांडली स्पष्ट भूमिका
- राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार? अखेर शरद पवारांनी सोडलं मौन
- ठाकरे सरकारने घेतलेले मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, थोडक्यात.
- ‘‘स्वबळाची तयारी सुरु केली आहे कारण…” नाना पटोलेंनी केला मोठा खुलासा!
- “मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खेळ मांडून गुणवत्ता संपविण्याचा घाट घातला आहे”