मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणात आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आज सकाळी ६ वाजता छापा टाकला. यावेळी त्यांच्या घरातून काही रोख रक्कम, एक पिसुल, काही काडतुसे आणि सोबतच काही महत्वाची कागदपत्रे मिळाली असून, दुसरीकडे प्रदीप शर्मांना देखील एनआयच्या दुसऱ्या एका पथकाने लोणावळ्यातून ताब्यात घेतले. प्रदीप शर्मांचा या दोन्ही प्रकरणात संबंध असावा, असा संशय एनआयएकडून व्यक्त केला होता. त्या अनुषंगानेच आज ही कारवाई करण्यात आली असून, आता प्रदीप शर्मा सहा तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. याआधीही दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली आहे.
एनआयएने, प्रदीप शर्मा यांच्यावर मनसुख हिरेन प्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा आरोप केला असून, आज त्यांना एनआयएच्या स्पेशल कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं. ततपूर्वी त्यांची आरोग्य तपासणी जे जे रुग्णालयात करण्यात आली. यानंतरच त्यांना एनआयए विशेष कोर्टात हजार करण्यात आलं. यावेळी कोर्टात पार पडलेल्या सुनावणीनंतर त्यांना, २८ तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावली गेली असून, त्यामुळे आता मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एनआयएने अटक केलेल्या आरोपींची संख्या ८ झाली आहे. २ दिवसांपूर्वीच एनआयएनं शर्मा यांच्या २ निकटवर्तीयांना, बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना, ॲंटिलिया स्फोटकं आणि मनसुख हत्या प्रकरणात अटक केली होती.
दरम्यान, या दोन आरोपींनी या हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा असल्याचे सांगण्यात आले असून, यांच्याच आदेशाने आपण मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा दावा सतीश आणि मनिष सोनी या आरोपींनी एनआयएच्या कोठडीत केल्याचं वकिलांनी सांगितलं आहे. तसेच, मनसुख यांच्या हत्येनंतर या दोन आरोपींनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझेंना संपर्क साधला होता. तेव्हा, या हत्येसाठी या दोन्ही आरोपींना मोठी रोख रक्कम देण्यात आली होती,’ असा दावा देखील एनआयएच्या वकिलांनी केला आहे.
त्यामुळे, सतीश, मनीष, रियाझ काझी, सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात सहभाग होता. तसेच, संतोष शेलार आणि आनंद जाधव हेही या कटात सहभागी होते आणि सचिन वाझे – प्रदीप शर्मा यांनी हा संपूर्ण कट रचून पुरावे नष्ट केले. एनआयएने याआधी देखील प्रदीप शर्मा यांचा जबाब नोंदवला होता. त्यावेळी त्यांचे बँक डिटेल्स, सीडीआरही काढला होता. मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही आणि त्यांना सोडून देण्यात आलं, असा युक्तिवाद वकिलांनी कोर्टात केला आहे. यावेळी सुनिल मानेची पून्हा कस्टडी मागण्यात आली असून, ज्या गाडीत मनसुखचा हत्या झाली. ती तवेरा गाडी संतोष शेलारची आहे, असे एनआयएने सांगितले आहे.
Mumbai | Shiv Sena leader and former 'encounter specialist' of Mumbai Police, Pradeep Sharma and two others produced before the Special NIA court
— ANI (@ANI) June 17, 2021
तसेच, मनसुख हिरेन यांना सचिन वाझेनेच फोन करून बोलावले. त्यावेळी गाडीत वाझेसोबत सुनिल मानेही होता. या दोघांनी मनसुखला मनीष, संतोष, आनंद, सतीश यांच्या गाडीत बसण्यास सांगितले. ४ मार्चला मनसुख घराबाहेर पडले त्यानंतर ता. ५ मार्चला मनसुख यांचा मृतदेह मिळाला, असं सांगतानाच, कारमायकल रोडवरील एक्सप्लोझिव्ह प्रकरणात सचिन वाझे याच्यासोबत प्रदीप शर्मा यांचाही सहभाग होता, असंही एनआयनं म्हटलं आहे.
कोर्टात काय काय झालं?
NIA – प्रदीप शर्मा यांच्या घरातून एक पिस्तुल आणि जिवंत काडतुसे मिळाली आहेत. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि पिस्तुल कशासाठी असा प्रश्न NIA ने कोर्टात उपस्थित केला.
प्रदीप शर्मा – 1997 साली हे पिस्तुल मला मिळालं होतं. यासंदर्भातले सगळे पुरावे आणि कागदपत्रे माझ्याकडे आहेत. त्या पिस्तुलचे लायसन्स माझ्याकडे आहे फक्त ते मला रिन्यू करता आलं नाही पण त्याची प्रोसिजर बाकी आहे.
NIA – मनसुख हिरेनची हत्या ज्या दिवशी झाली तेव्हा वाझेने त्याला फोन करुन घोडबंदर रोडला बोलवलं होतं. त्यावेळी वाझेसोबत सुनील माने होता. दोघांसोबत मनसुख गाडीत बसला आणि त्यानंतर मनसुखला वाझे आणि माने याने इतर आरोपींकडे सोपवलं.
NIA – मनसुखला ज्या गाडीत बसवण्यात आले ती गाडी आरोपी मनीष सोनी चालवत होता आणि त्याच गाडीत आरोपी सतीश, संतोष शेलार आणि आनंद जाधव होते, ज्यांनी मनसुखची हत्या केली, असा आम्हाला संशय आहे.
NIA – आम्हाला न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपी सुनील मानेची पुन्हा कोठडी हवी आहे जेणेकरून या आरोपीना समोरासमोर बसवून आम्ही चौकशी करू शकू
प्रदीप शर्मा काय म्हणतात?
1997 मध्ये मी शस्त्र विकत घेतलं आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माझा सहभाग असता, तर मी थांबलो असतो का? सचिन वाझे आणि माझा काहीही संबंध नाही. जे चार जण पकडले, त्यांना मी ओळखतही नाही. संतोष हा माझा जुना खबरी आहे. मी सेनेचा आहे, असं सांगताना प्रदीप शर्मा कोर्टात भावूक झाले.
मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. संतोष हा माझा जुना खबरी असल्याचं सांगतानाच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेशी माझा काहीच संबंध नसल्याचं प्रदीप शर्मा यांनी कोर्टात स्पष्ट केलं आहे.
आत्तापर्यंत कोण पिंजऱ्यात?
1. सचिन वाझे
2. विनायक शिंदे
3. रियाझ काझी
4. सुनील माने
5. नरेश गोर
6. संतोष शेलार
7. आनंद जाधव
8. प्रदीप शर्मा
कोण आहेत प्रदीप शर्मा?
एन्काऊटंर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माची ओळख
मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी
113 गँगस्टरचं एन्काऊटंर प्रदीप शर्मा यांच्या नावे
शिवसेनेच्या तिकीटावर 2019 मध्ये नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र पराभव
1983 पासून मुंबई पोलिस दलात कार्यरत होते
लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात 2010 मध्ये अटक झाली होती
2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले
प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात करण्यात रूजू आलं
2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती
Read Also :
- ‘मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणी अटक झालेल्या सगळ्यांचे ‘गॉडफादर’ उद्धव ठाकरे?’
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार
- अनिल देशमुखांना धक्का! महत्त्वाची कागदपत्रे हाती, ईडीने नागपूरमध्ये केली 3 जणांची गुप्त चौकशी