मुंबई : सरकार MPSC बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. सरकार, आयोग काय करतंय?, स्वप्निल सारखे अनेक आज आमहत्या करण्याचा विचार करत आहेत. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, असा प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणविसांनी स्वप्निलची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेला दांडी, रिकामी खुर्ची असलेल्या फोटो व्हायरल
सरकारने लोकशाहीला कुलूप लावलं, प्रश्नोत्तरे, तारांकित प्रश्न नाहीत, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले होते. दरम्यान, फणवीसांच्या संतापवरून काँग्रेसचे नाना पटोलेंनी प्रत्यत्तर देत एकमेकांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधाक आमने सामने पहायला मिळाले.
पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार; सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना दोन दिवस पुरेशे
राज्य सरकार या अधिवेशनात ओबीसींच्या इम्पिरिकल डेटाचा ठराव मांडणार आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. इम्पिरीकल डेटाचा ठराव हा निव्वळ वेळकाढूपणा आहे. त्यातून काहीही साध्य होणार नाही. परंतु, तरीही ओबीसींसाठी आम्ही या ठरावाला पाठिंबा देणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
कर्मवीर शंकरराव काळे साखर सहकारी कारखान्याला अर्थमंत्रालयाकडून आर्थिक शिस्तीचे ‘प्रशस्तीपत्रक’
विधीमंडळातील ओबीसींच्या इम्पिरीकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणाचं धोरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरीकल इन्क्वायरी करायला सांगितली आहे. सेन्सस नाही. कृष्णमूर्ती खटल्यातही तेच म्हटलं आहे. पण हे सरकार वेळकाढूपणा करून दिशाभूल करत आहे. त्यासाठीच हा ठराव आणला आहे. तरीही आम्ही या ठरावाला समर्थन देऊ. ओबीसी, मराठ्यांसाठी जे काही चांगलं होत असेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असं फडणवीस म्हणाले.
Read Also :
- सरकारची पाठराखण करण्यासाठी चमचेगिरी करू नका; सुधीर मुनगंटीवार सत्ताधाऱ्यांवर भडकले
- पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार; सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना दोन दिवस पुरेशे
- कर्मवीर शंकरराव काळे साखर सहकारी कारखान्याला अर्थमंत्रालयाकडून आर्थिक शिस्तीचे ‘प्रशस्तीपत्रक’
- मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केल्यावरच सरकारला जाग येणार का?, त्या आईचा आक्रोश
- नियम झुगारून सोलापूरात मराठा मोर्चा; आमदार समाधान औताडे पोलिसांच्या ताब्यात