मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी अचानक साडे अकराच्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले असून, त्यांच्यासोबत यावेळी महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी तसेच, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहलही उच्च न्यायालयात दाखल झाले असल्याचं समजत आहे.
मुख्यमंत्र्यांची ही भेट ठरलेली नव्हती. तसेच भेटीचे कारणही अद्याप गुलदस्त्यात असून, मुख्यमंत्र्यांनी थेट मुख्य न्यायाधीशांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. शिष्टाचार असा आहे की मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्र्यांची किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांची भेट घेऊ शकत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री हे न्यायाधीशांची भेट घेऊ शकतात. त्यानुसार आज ही भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
दरम्यान, कालच राज्य सरकारकडून न्यायालयाला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना कोणतीही अटक होणार नाही, अशी हमी दिली गेली आहे. परमबीर सिंग यांच्यावर पोलीस अधिकारी बी.आर. घाडगे, अनुप डांगे, तसेच बुकी सोनू जालान यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले असून, भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनुसार, अॅट्रोसिटी प्रिव्हेन्शन अॅक्टद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, राज्यातल्या लसीकरण प्रश्नावरून आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही ही सदिच्छा भेट घेत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप याला कोणीही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे तर्क वितर्क लढवले जात आहेत.
Read Also :
- लशीचे डोस राज्यांना पुरवण्यास केंद्रसरकार अपयशी; खासदार असदुद्दीन ओवेसी यांची टीका
- एक प्रेम कथा लवकरच! करुणा धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट व्हायरल
- ‘पंतप्रधानांनी पाकिस्तानात बिर्याणी खाल्ली, तेव्हा धर्म भ्रष्ट झाला का?’
- महाविकास आघाडीत वाद ? मुख्यमंत्री ठाकरेंची पवारांकडे नाराजी
- ‘मराठा समाजाचं आंदोलन होऊ नये म्हणून लॉकडाऊन वाढवला’