मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा नावाच्या महिलेने गंभीर आरोप केले होते. नंतर या महिलेने आरोप मागे घेतले. महिलेचे आरोप फेटाळून लावताना मुंडे यांनी करुणा नावाच्या महिलेसोबतचे संबंध मान्य केले होते. आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत. याला कारण ठरली आहे करुणा मुंडे यांची फेसबुक पोस्ट.
धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा मुंडे यांनी लवकरच आपली प्रेमकथा पुस्तक रुपात प्रकाशित करणार असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. करुणा धनंजय मुंडे यांनी पुस्तक प्रकाशित करणार असल्याचं जाहीर केल्याने आता त्यांच्या आणि धनंजय मुंडे यांच्या नात्यांबाबत चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे, असे करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी करूणा मुंडे यांनी राजकारणात येण्याची इच्छा असल्याचे देखील म्हटले होते. आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचाही बोलून दाखवली होती.
Read Also :
- ‘पंतप्रधानांनी पाकिस्तानात बिर्याणी खाल्ली, तेव्हा धर्म भ्रष्ट झाला का?’
- महाविकास आघाडीत वाद ? मुख्यमंत्री ठाकरेंची पवारांकडे नाराजी
- ‘मराठा समाजाचं आंदोलन होऊ नये म्हणून लॉकडाऊन वाढवला’
- अक्षय तृतीयेदिवशी मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट, जमा होणार किसान योजनेचा आठवा हप्ता
- ‘शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात आणि…’