मुंबई : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून, या पार्श्वभूमीवर आज त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची, त्यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ या घरामध्ये भेट घेतली.
दोन्ही नेत्यांची भेट ही केवळ १५ मिनिटांची होती. या भेटीत संभाजीराजे यांनी थेट मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत शरद पवारांशी चर्चा केली. मराठा समाज या मुद्द्यावरून किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, तसेच मराठा समाजाची एकंदरीत परिस्थिती कशी आहे, याची कल्पना त्यांनी यावेळी शरद पवारांना दिली. यावेळी त्यांनी, ‘मुख्यमंत्री, विरोधी पक्ष, नारायण राणे यांना एकत्र आणलं आणि त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा,’ अशी विनंती पवारांना केली असून, आमची चर्चा सकारात्मक झाली असल्याची प्रतिक्रिया, त्यांनी भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान, त्यांचा हा दौरा आता शेवटच्या टप्प्यात असून, आज ते पुण्यात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत, तसेच इतर काही मराठा नेत्यांशी देखील भेट आणि चर्चा करून, ते उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा होईल. आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी ते मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.
दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेबद्दल स्पष्टता ही त्यांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेनंतरच येईल.
Read Also :
- ४-४ वेळा पत्र लिहून भेट दिली नाही हे सांगता, याआधी ४० वेळा भेट झाली ते का नाही सांगत?
- महाविकास आघाडीचे नाराजी नाट्य; पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर अजितदादांसह अनेकांची हजेरी
- मोठी बातमी: पिंपरीच्या राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला अटक
- शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा
- ‘म्युकरमायकोसिसच्या मोफत उपचाराबाबतची सरकारची घोषणा फसवी’